कर्करोगावरील उपचारांसाठी नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची मुभा
जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाण्याची मुभा गोयल यांनी उच्च न्यायालयाकडे मागितली. हायकोर्टाने त्यांची मागणी मान्य करत परदेशात जाण्याचा परवानगी दिली आहे. तसेच स्वतःचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवण्याची मुभाही न्यायालयाने दिली.
नरेश गोयल यांना 2024 मध्ये जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामिनाच्या अटींनुसार त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा होता आणि परदेशात जाण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. परदेशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी गोयल यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. गोयल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात बाजू मांडली.
Comments are closed.