पी. टी. उषांची माघार, अध्यक्षपदासाठी गगन नारंग, राजीव मेहता, वीरेंद्र सचदेवा यांच्यात तिरंगी लढत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. विद्यमान अध्यक्षा पी. टी. उषा यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे. अध्यक्षपदासाठी आता माजी सरचिटणीस राजीव मेहता, तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस वीरेंद्र कुमार सचदेवा आणि लंडन ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.

येत्या 5 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उषा यांनी आयओए कार्यालयाकडे पाठ फिरवली. त्या पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी अर्जच दाखल केला नाही. त्यांच्यासाठी अध्यक्षपदाची फेरनिवडणूक आधीपासूनच कठीण बनली होती. 9 नोव्हेंबरला झालेल्या ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ आऊटस्टँडिंग मेरिट’च्या महिला गटातील निवडणुकीत त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. त्या पाचव्या क्रमांकावर राहिल्या.

Comments are closed.