पुरुष आणि महिला खेळाडू एकाच संघात खेळणार, झहीर खान आणतोय अनोखी इक्वल टी-20 लीग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज  झहीर खान ‘इक्वल’ ही नवीन टी-20 लीग आणणार आहे. या लीगमधील संघांत पुरुष-महिला एकत्र खेळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या लीगचा उद्देश पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना एकाच संघात स्थान देऊन क्रिकेटच्या पारंपरिक स्वरूपात बदल घडवणे आहे. झहीर खान आणि आयटी उद्योजक नागेंद्र सिद्धौतम यांच्या सह-मालकीच्या ‘अँकर स्पोर्ट्स’ने ही संकल्पना आणली आहे. जर्मन क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने ही लीग खेळवली जाणार आहे.

‘इक्वल’ हा फ्रँचायझी क्रिकेट लीगचा एक पूर्णपणे नवीन प्रकार असून यामध्ये व्यावसायिक पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकत्र खेळतील. यामुळे टी–20 क्रिकेटसाठी एक नवीन आणि सर्वसमावेशक स्वरूप उपलब्ध होईल. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा मोडून सर्व खेळाडू एकाच स्पर्धेत सहभागी होतील.

संघांचे शेवटचा अकरा खेळाडू कसे असतील?

सुरुवातीच्या स्वरूपानुसार पाच संघ 12 टी–20 सामने खेळतील. प्रत्येक संघात 18 खेळाडू असतील. प्रत्येक अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असेल.

Comments are closed.