Ratnagiri News – हद्दच झाली! उत्तर प्रदेशातील तरूणाने चिपळूणात केली चक्क गांजाची लागवड
रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मिशन फिनिक्स अंतर्गत चिपळूण येथे पिंपळी खुर्द येथे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३८ हजार ३०० रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत, पटेल सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांज्याच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून हि कारवाई केली आहे. कारवाईत ०.५५३२ किलो ग्रॅम वजनाची १ लाख ३८ हजार ३०० रुपये किंमतीची गांज्याची झाडे जप्त केली आहेत. पटेल सॉ मिलच्या कामगारांसाठी आरक्षित खोलीत रहाणाऱ्या अभय प्रदीप पांडे वय २० रा. अयोध्या उत्तर प्रदेश याने स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने केली. या पथकात उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि अतुल कांबळे यांचा समावेश होता.
Comments are closed.