एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही…; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, नरेंद्र पाटीलही बोलले
ठाणे : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सुत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नवे एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेऊन तपासासंदर्भात आढावा घेतला. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून नाना पटोले यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी मराठा नेत्यांना, मंत्र्यांना उद्देशून लक्ष्य केलं. महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी सर्वात पहिली मी केली आहे. कोणतीही चौकशी केली त्याला काही अर्थ नाही. सर्व गोष्टी त्यांना अवगत होतील आणि ताकदीनिशी बाहेर पडतील. त्यामुळे देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. मला आश्चर्य वाटते की, मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लक्ष्य केलं. समाजापेक्षा मंत्रिपद महत्वाचे आहे का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.
महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुंबीयांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्याप्रकरणावरुन आता वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळातील मराठा नेत्यांना उद्देशून भाष्य केलं. मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं. तर, दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे.
वाल्मिक कराड असून 302 चा आरोपी नाही
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला मिळेल यावर बोलताना, आम्हाला काय करायचे पालकमंत्री पदाबाबत असेही आव्हाडयांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचे आतमधून किती गुळपीट आहे, हेच मला सरकारला दाखवायचा आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले. मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मीक कराड पकडला जाईल, अशी अपेक्षा करतात तुम्ही. पम, वाल्मिक कराडला अजून 302 चा आरोपी केला नाही. अधिवेशन संपायची वाट पाहत होते, खूप काही गोष्टी समोर येतील. पण, खूनामध्ये त्यांची भागीदारी आहे, व्यवसाय राहू द्या बाजूला, असेही आव्हाड यांनी म्हटले.
यांना मंत्रिपद, पालकमंत्रीपद नको
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं. नागपूर अधिवेशनामध्ये जी चर्चा झाली ते कृतीमध्ये दिसत नाही. सरपंच म्हणून देशमुख यांनी खूप चांगली भूमिका बजवली आहे. बीडमध्ये जेवढी अनधिकृत काम चालू आहेत, ते नक्की कोणाचे आहेत हे एकदा बघितलं पाहिजे. येथे दोन नंबरचे व्यवसाय कोण करतं, डीपीडीसी बैठकीमध्ये कोणाला काम द्यायला पाहिजे हे गुंड ठरवतात, असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच, आम्हाला वाटतं की ह्यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळायला नाही पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी कृतीमध्ये आणायला पाहिजे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
हेही वाचा
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
अधिक पाहा..
Comments are closed.