चंद्रपूर वाघ अन् ‘वारां’चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां’चा सन्मान करतो, कारण…; मुनगंटीवारांच्
चंद्रपूर : राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) हे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि स्वागताध्यक्ष होते. माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद देण्यात आले. यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलंय.
कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादासाहेब यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, अशा नेत्याचा समाजाला विसर पडू नये म्हणून मी या कार्यक्रमाला आलोय. हा वाघ आणि वारांचा जिल्हा आहे. मुनगंटीवार आमचे नेते आहेत. आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
…म्हणून दादासाहेबांना कर्मवीर म्हंटलं जातं
ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांना दादासाहेबांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रुग्णालय ही दादासाहेबांची संकल्पना होती. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. दादासाहेबांनी आपल्या जीवनात काही मानकं तयार केली, म्हणून त्यांना कर्मवीर म्हंटलं जातं. आम्ही दोघेही उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री झालो, मी मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. दादासाहेबांवर एक गौरव ग्रंथ आम्ही राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून तयार करू. माझ्या जिल्ह्यातील व्यक्तीचा गौरव करण्यासाठी मला बोलावलं, यासाठी आयोजन समितीचे धन्यवाद, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय की, काल मला निमंत्रण आलं तसेच जोरगेवारांचा यांचा कॉलही आला. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईत असल्याने आज या कार्यक्रमाला जाणे शक्य होणार नाही. माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं आहे. किंबहुना माझ्या शिफ्टिंगचा आज शेवटचा दिवस असल्याने माझी गैरहजेरी असणार याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.