घरची लक्ष्मी होती, मला तिला मारायचं नव्हतं; पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने हत्या, VIDEO शूट कर

गुन्हे बातम्या ठेवा पुणे: पुण्याच्या खराडीत कौटुंबीक वादातून पतीने पत्नीचा खून (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने  शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीवर वार करुन खून केला. यानंतर आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. चंदननगर पोलिस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. दरम्यान, पत्नीचा खून झाल्यानंतर पतीने बनवलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आरोपी पती काय बोलतोय?

मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती, तिला मारावं किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मारावं लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत, असं आरोपी शिवदास गिते व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन आरोपीने सगळा घटनाक्रम सांगितला-

शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा तिच्या चारित्रावर संशय घेत होता आणि यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते. जानेवारी 15 रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदास याला संगत होती. 22 जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास हिला त्रास देत असल्याचे ज्योतीने सांगितलं. संध्याकाळी पावणे 7 वाजता, ज्योती तिच्या पतीला परीक्षांचे अभ्यास करण्यास सांगत होती याचा राग आल्याने शिवदास याने शिलाई मशीन वर वापरण्यात येणाऱ्या कात्री ने त्यांच्या मुलाच्या समोर ज्योतीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाहीतर त्याने खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला. यानंतर शिवदास ने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवदास गिते मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भाग भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी पहाटे (22 जानेवारी) त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातमी:

पुण्यात पत्नीला शिलाई मशीनच्या कात्रीने संपवलं, रक्ताने माखलेल्या हातांनी पती स्वत: पोलिसात हजर!

अधिक पाहा..

Comments are closed.