संतोष देशमुखांच्या मुलांच्या डोळ्यातील दु:ख पाहा; दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे, राजीनाम्याचा वाढता दबाव पाहून धनंजय मुंडेंनी थेट भगवान गड गाठून महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी (Namdeo shastri) धनंजय मुंडेंची पाठराखण करत, भगवान गड भक्कमपणे त्यांच्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यावरुन वाद निर्माण झाला असून महंतांनी राजकीय भाषा बोलू नये असा सूर राजकीय वर्तुळातून उमटला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रे दिले असून पुरावे म्हणून ते नामदेव शास्त्रींना देण्याची विनंती केली आहे.
आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना भेटल्यावर खूप अवस्थ वाटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जिवांचा? का वडलांचे छत हिरावून घेतलं गेलं यांचं?. आम्ही यांचे पुरावे पाहिले. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे बॅलन्स शीट पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींना काही सवाल केले आहेत.
मी एसपी ना, ADG, DG, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्टाच्या चीफ जस्टिस यांना देखील पुरावे सादर केले आहेत. दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख आपल्याला भेटायला उद्या येणार आहेत, त्यांच्य बरोबर मी हे पुरावे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि… असे ट्विट दमानिया यांनी केले. तसेच, संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावे, अशी विनंतीही नामदेव शास्त्रींना एका व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
धनंजय मुंडेंनी नैतिकतेची जाण ठेऊन राजीनामा द्यावा
मंत्री धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत 19 जून रोजी शासकीय निवासस्थानी बैठक झाली, त्या बैठकीत अवादाचे लोकं होते, एआयचे होते, काही सिक्युरिटीचे होते. त्यामुळे, तिथं बसून खंडणीचा व्यवहार नक्की झाला असेल तर शासकीय बंगल्यात ही घटना घडतेय. त्यामुळे, तसं असेल तर त्यांच्यावरच मकोका लागला पाहिजे, अशी मागणी तुमची असायला हवी होती. पण, तुम्ही त्यांचे समर्थन करतात आणि त्यांना भगवान गडाचा पाठिंबा जाहीर करताय, असे म्हणत अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यावर नाराजी व्यक्त केली. आता पांडुरंगालाच मी विनंती करते की नैतिकतेची जाण धनंजय मुंडेंना व्हावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांमध्ये आज बैठक झाली असून सकाळी नऊ वाजता धनंजय देशमुख हे भगवानगडावर जाण्यासाठी निघणार आहेत आणि भगवान काळाचे महंत नामदेव शास्त्री यांना ते संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सगळ्या आरोपींचे पुरावे सादर करणार आहेत.
माननीय नामदेव शास्त्रींजी,
आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला.
आम्ही स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो,… pic.twitter.com/pxxoy8U6W
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_दमानिया) 1 फेब्रुवारी, 2025
अधिक पाहा..
Comments are closed.