एखादा स्वाभिमानी माणूस असता तर मुंबईत भाड्याने घर घेऊन राहिला असता; धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला
धनंजय मुंडे वर अंजली दमानिया: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. 4 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, नियमानुसार पुढील 15 दिवसांच्या आत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार, 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी झाला. मात्र, अद्याप भुजबळ यांना शासकीय निवास मिळालेला नसल्याने ते गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संताप व्यक्त केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. आज 4 ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी शासकीय बंगला खाली केलेला नाही. त्याचं असं म्हणणं आहे की, माझं आजारपण आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता त्याने टू बेडरूमचं घर विकत नसेल तर मुंबईत भाड्याने घर घेऊन ते राहिले असते. पण शासकीय बंगला न सोडणे हे अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यावर आजतागायत 46 लाखाचा दंड बसतो, तो माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र, तो माफ करण्यात येऊ नये, अशी मी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांना करते. एकही रुपया दंड माफ करू नका. त्यांच्याकडून दंड वसूल करून चार दिवसाच्या आत हा बंगला खाली केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळांची प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे. आता राहायला जावं असे म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक दे ‘धक्का’; विधानसभा लढवलेले राहुल मोटे अजित पवारांसोबत जाणार
आणखी वाचा
Comments are closed.