जुन्या वादातून युवकाचा 3 महिलांवर जीवघेणा हल्ला; एकीचा जागीच मृत्यू, 2 महिलांची मृत्यूशी झुंज
बुलधाना गुन्हेगारीच्या बातम्या: बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली असून दररोज हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. अशातच बुलढाण्याच्या खामगाव शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीत गोलू सारसर या युवकाने घरात शेजारी राहणाऱ्या तीन महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला (Crime News) केलाय. हा हल्ला इतका भीषण होता की यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत. 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही जखमी महिलांवर अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. तर हल्ला केल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास आरोपीला अटक केली आहे. यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
खाजगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू
गोंदिया ते बालाघाट दरम्यान चालणाऱ्या एका खाजगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या(11 फेब्रुवारी) सुमारास गोंदिया शहरालगत असलेल्या कटंगी या ठिकाणी घडली. गोंदिया जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस चालत असतात. या खाजगी बसेस मधून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. काल (11 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमरास क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन एक बस निघाली होती. बसमधे प्रवासी जास्त असल्याने काही प्रवासी बसच्या गेटवर उभे होते. दरम्यान कटंगी गावाजवळ अचानक एक प्रवासी खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. गुनेद्र पटले (२९) रा. किरणापूर मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.
मॅग्नीज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या भीषण अपघातात, चालकाचा मृत्यू
मॅग्नीज घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रकखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या शिंगोरी फाट्यावर घडली. अनिल वरखडे (२७) असं मृतक चालकाचं नाव आहे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स येथून मॅग्नीज भरून हा ट्रक निघाला असताना हा अपघात घडला. कारधा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.