ठाकरे गटाच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच करणार सुरुवात
शिवसेना ठाकरे गट बैठक: शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group) नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. ठाकरे गटाच्या नेते आणि उपनेत्यांची बैठक ही शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते 2 मार्च पासून राज्यभर दौरा करणार आहे. त्यासंदर्भानं ही बैठक महत्वाची मानली जातेय.
2 मार्चला ठाकरेंचे शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत. 2 मार्चला ठाकरेंचे शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर आहेत. तर उद्धव ठाकरे 9 मार्चला मुलुंडमध्ये ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांचा शिबिर घेणार आहेत. राज्यभरातील पक्ष संघटनेचा आढावा त्यासोबतच नेत्यांच्या दौऱ्यांची नियोजन आजच्या या आठवडा बैठकीत नेते उपनेते करणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पुढील रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि पक्षातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. 9 मार्चला ईशान्य मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिबिर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केला आहे. या शिबिराला उद्धव ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते राज्यातील विविध ठिकाणी जाऊन दौरे करणार आहेत. त्याची सुरुवात 2 मार्च पासून ठाण्यातून होणार आहे, जो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो.जिथे शिवसेनेची ताकद आणि संघटना मजबूत करण्याची गरज आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दौरे करणार आहेत. त्याचे नियोजन आजच्या बैठकीमध्ये केला जाणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच कोकणातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं अशा स्थितीत पक्षाची संघटनात्मक बांधणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ मोडून काढायला उद्धव ठाकरे मैदानात, कोकणात फिरुन कट्टर मावळ्यांना चेतवणार
अधिक पाहा..
Comments are closed.