केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचा विनयभंग होतो, फडणवीस महाराष्ट्रात काय पेरतायत? संजय राऊतांचा सवाल

मुंबई : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीचाच विनयभंग होतो आणि गृहमंत्री कोण, तर देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis). राजकारणातून गृहखात्याकडे बघायला यांना वेळचं मिळत नाहीये. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मोठं सामाजिक कार्य या राज्यात उभं केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis)  तुम्ही महाराष्ट्रात काय पेरताय? जिते सत्तातिथे हे बलात्कारी, हत्यारे आणि गुन्हेगारी असंच चित्र असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदर संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये काही टवाळखोरांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या कन्येची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, ज्या मुलांनी ही छेड काढली ती मुले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणावर बोलतांना खासदर संजय राऊतांनी तोफ डागत हल्लाबोल केला आहे.

हा दिघेसाहेबांचा अपमान नाही का?- संजय राऊत

ठाण्यातील आनंदआश्रम येथे काल आम्ही गेलो असता, आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला. आनंदआश्रम शिंदेंनी बळकावले असून नावावर करून घेतले आहे. आम्ही दिघेसाहेबांना शाल व हार घातला. आम्ही गेल्यावर याच गुंडांनी ते रस्त्यावर फेकले. हा दिघेसाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल ही खासदर संजय राऊतांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकाचं काय? लाडक्या बहि‍णीचा दररोज खुळखुळा वाजवताना बीडमध्ये काय चाललयं? मुंडेंची पत्नी व मुलगी परत उपोषणाला बसले आहेत. असेही ते म्हणाले.

विरोधीपक्ष नेतेपदी नक्कीच आमचा हक्क आहे- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) आजपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का? असा सवाल उपस्थित होत असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना उत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितलं. अशातच या वर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, विरोधीपक्ष नेतेपदी नक्कीच आमचा हक्क आहे. सत्ता कोणाची ही असो, विरोधीपक्षाने आपली कामगिरी चोख बजावली पाहिजे. तुम्ही जरी संशयास्पद निवडून आला असलात तरी भ्रष्टाचारांना वेसन घालण्यासाठी लोकशाहीने तो हक्क दिलाय. विरोधीपक्ष नेत्याचा निर्णय विधीमंडळ पक्ष घेतो. असेही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते

अधिक पाहा..

Comments are closed.