धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह
धनंजय मुंडे राजीनामा: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलाय .गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्येवरून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे . सीआयडीच्या तपासात दोषारोपात सादर झालेले पुरावे व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे .बीड शहरात नागरिकांनी बंद पुकारलाय .दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत .वाल्मीक कराडला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे तसेच धनंजय मुंडे यांना सहा रोपी करण्यासाठी ही अनेक जण आक्रमक झाले आहेत .
त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू: जितेंद्र आव्हाड
जातीचा वापर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते .तशा प्रयत्नांमध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही . घटनाक्रम बघा नागपूर अधिवेशनापूर्वी ही हत्या झाली. त्याचं वर्णन मी अधिवेशनात सांगितली. सरकारकडे इंतभूत माहिती असताना राजिनामा का नाही घेतला? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. सर्व फोटो सर्व माहिती होती.म्हणून मी दगड आणला, कारण सरकारला पाझर फुटुत नव्हता. ज्या जातीचा धनजय मुडे आहे त्याच जातीचा मी आहे. अशी क्रूरता ज्यात आहे त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू शकतो. हे सर्व झालं जी अवादा कंपनी खंडणी वसूल तसेच वाल्मिक आणि धनंजय मुडे यांचे संबघ आहेत.
आदित्य ठाकरे आक्रमक, तीन प्रमुख मागण्या
धनंजय मुंडे गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले .त्यांच्यात एक बैठक झाली .मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेऊ शकत नाहीत ?मुख्यमंत्र्यांना कळत नाही ? गेल्या काही दिवसांपासून इतकं घाणेरडे राजकारण सुरू आहे .कधी सरपंचाला सांगतात फंड नाही देणार .तुम्हाला अधिकारात नाही देणारतुम्हाला फंड नाही देणार .एका सरपंचाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही .हे सरकार बरखास्त केले पाहिजे .अशी आक्रमक प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली . सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंनी या तीन मोठ्या मागण्या केल्या.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा: संदीप क्षीरसागर
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे . लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडिया वरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे . लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेला आहे . खंडणी प्रकरणात जर सातपुड्यावर मीटिंग झाली असेल हे सुरेश धस जे बोलले आहेत .ते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत .तसं असेल तर त्यांना सह आरोपी करायला हवं . ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय सर्वच सभागृहांमध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले यशस्वी ची बदल झाली सीआयडी ची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपासा आम्ही बघितलं आमच्या सर्वांचा आमदारांची त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मीक करायला घेतलेला आहे . वाल्मीक कराडला फाशी दिली पाहिजे असे क्षीरसागर म्हणाले .
सुरेश धस म्हणाले..
राजीनामा देऊन थांबणार नाही .
खंडणीमुळे हे सगळं घडलाय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली
सगळयांचा CDR चेक करावं.सगळ्याच्या डोळ्यात पाणी आला असणार फोटो पाहल्यानंतर आमच्या पंकजा मुंडे ना विचारा त्या म्हणतात पुण्याचा प्रश्न विचारा बीड चा प्रश्न त्यांना विचारू नका. भाजप चा बूथ प्रमुख संतोष देशमुख होता त्याला न्याय मिळाला पाहिजे .कोण काय म्हणत मला काही घेणं देणं नाही.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.