आठवडा उलटूनही कोरटकर पोलिसांना सापडत नाही? मुधोजीराजेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

प्रशांत कोराटकर: इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी नागपूरकर भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले (Mudhoji Raje Bhonsle) हे आता चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप असणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी मुधोजीराजे भोसले यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे पत्र पाठवले आहे. कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकरल 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत जामीन न मिळता पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी. तसेच विद्वान सरकारी वकिलाची नेमणूक करावी. अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. तसेच प्रशांत कोरटकरला इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात ही जामीन मिळू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावे असेही या पत्रात म्हटले आहे.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोह, राजद्रोहाची शिक्षा व्हावी. तसेच अशा लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करावी. प्रशांत कोरटकरला फरार होण्यास सहकार्य करणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात असलेल्या लोकांचा तपास करून कारवाई करावी. तसेच प्रशांत कोरटकर यांच्याकडे असलेली संपत्ती सरकारने जमा करावी. अशा मागण्याचे पत्र मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना पाठवले आहे

पत्राचा नेमका आशय आणि मागण्या काय?

मी आपणास प्रत्येकास पत्र पाठवले तर ते आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत अधिवेशनाचा पहिला आठवडा संपणार. त्यामुळे विषय आपल्या सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी मार्ग म्हणून प्रसारमाध्याच्या मार्ग निवडला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 मार्च 2025 पासून सुरू झाले.  त्या अनुषंगाने आपण सर्वच विधानमंडळाच्या सभागृहात असणार. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या भाषणाची सुरुवात हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून करतात, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान वाटतो कि आमचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने शिवभक्त आहेत. त्याच पाठोपाठ सर्व पक्षी आमदार, खासदार, मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात, दैवता प्रमाणे पूजन ही करतात.

मात्र, त्याच महाराष्ट्रात प्रशांत कोरटकर सारखी विकृती हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज भोंसले, हिंदवी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती राजे संभाजी महाराज भोसले यांचा अवमान करून जातीय तेढ़ निर्माण करतात. असे असताना नागपूर राज्य संस्थापक हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांचा वंशज म्हणून आम्ही हे सहन करू शकत नाही. जी तत्परता संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखवली, तीच तत्परता कृपया कोरटकर प्रकरणात दाखवावी. संपूर्ण महाराष्ट्रात, देशात या निंदनीय प्रकरणाचे तीव्र पडसात उमटत आहे.

आठ दिवस लोटून सुद्धा पोलीस प्रशासनास आरोपी कोरटकर सापडत नाही. यामुळे पोलीस प्रशासना वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपी कुठे जातो हे आम्हास सूत्रांमार्फत समजते, परंतु पोलीस प्रशासनास हि माहिती मिळत नाही हि शोकांतिकाच, महाराष्ट्र व देशातील नागरी अठरापगड जाती, बारा बलुतेदार, सर्वच शिवभक्त संघटना, आपल्याकडून म्हणजेच सरकारकडून न्यायाची अपेक्षा करीत आहे. असे  मुधोजीराजे भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

नेमक्या मागण्या काय?

1)कोल्हापुरात दाखल गुन्ह्यात अंतिरीम जामीन मिळाला. त्या जामिनावर वर 11मार्चला सुनावणी पा त्या सुनावणी दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी आपली बाजू भक्कम पणे मांडावी.

2) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कस्टडीची मागणी करावी.

3) विद्वान सरकारी वकीलची टीम सरकारने पुरवावी

4). नागपूर, जालना व इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून सरकार व पोलीस प्रशासनाने भूमिका बजवावी.

5) कोल्हापूर येथून मिळालेल्या जामिना नंतर नागपूर व इतर गुन्ह्यात त्याला जामीन मिळणार नाही याची काळजी घ्यावी.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.