धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, नताशा आव्हाड संतापल्या; ट्विट करुन सुनावलं

मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री धनंजय यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन हेलावणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्‍यांनी त्यांचा राजीनामा (राजीनामा) मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या राजीनाम्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले असून सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होत आहे. त्यातच, धनंजय मुंडेंनी (dhananjay Munde) ट्विट करुन राजीनाम्याबाबत माहिती दिली. माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुण आणि वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटलं. मात्र, धनंजय मुडेंमध्ये राजीनाम्याचं खरं कारण सांगण्याची विनम्रताही नाही, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी म्हटलं आहे. नताशा यांनी ट्विट करुन धनंजय मुंडेंच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, राजीनाम्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि धनंजय मुंडेंची मांडलेली भूमिका वेगळी असल्याचंही त्यांनी सूचवलंय.

नताशा यांनी धनंजय मुंडेंच्या ट्विटला रिट्विट करत आपलं परखड मत मांडलं. त्यानुसार, ”धनंजय मुंडेंच्या ट्विटच्या पहिल्या भागाचा ट्विटच्या दुसऱ्या भागाशी काहीही संबंध नाही. त्यांनी राजीनामा का दिला याचे खरे कारण सांगण्याची विनम्रताही त्यांच्यात नाही, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या तनाशा आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार पलटवार केला आहे. दरम्यान, अजित पवारांचा दावा आहे की त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. या सरकारने खरोखरच महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले आहे. हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता पण सरकार हा मुद्दा शांत होण्याची वाट पाहत होते. सुदैवाने, लोक मागे हटले नाहीत आणि मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मुळात, ज्या माणसाचे जवळचे सहकारी एका क्रूर हत्येत सहभागी होते, त्याला त्यांनी मंत्री म्हणून काम करू दिले हा महाराष्ट्राचा किती मोठा अपमान आहे!, असे तनाशा आव्हाड यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंचं ट्विट काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आहे.

हेही वाचा

आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.