खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवस कुठे होता? कसा पळाला? कुठे राहिला? पुणे-शिरूर-अहिल्यानगर-संभाजीनग

बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले सहा दिवस कुठे होता? तो कसा पळाला आणि कुठे कुठे राहिला? याची माहिती एबीपी माझाकडे आली आहे. खोक्याला काल प्रयागराजमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याने त्याच्या घरातून पळ काढला आणि पुणे गाठलं. तो पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने शिरूर कासार या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं, तिथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर संभाजीनगर गाठलं आणि तिथूनच त्याने प्रयागराजसाठी बस पकडली होती अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने राहते गाव सोडलं. त्याने थेट पुणे गाठलं. पुण्यामध्ये त्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस मुक्काम केला. त्याने हॉटेल देखील वेगवेगळे केले होते. पुढे तो माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी शिरूर कासार या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं. त्याने अहिल्यानगरमध्ये देखील एक दिवसाचा मुक्काम केला, त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला. तिथून त्याने ट्रॅव्हल्स पकडली आणि तिकडून तो उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे पोहोचला. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. तो नेमका कोण होता याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, तो प्रयागराज मधून देखील पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली होती.

तो विमानाने जाण्यासाठी म्हणून निघाला, त्यावेळी त्यांनी त्याच्या सोबती असलेल्या व्यक्तीला तिथेच ठेवलं. त्याने त्याला बसने प्रवास करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तिथून निघत असतानाच पोलिसांना त्याचा नंबर मिळाला आणि लोकेशन ट्रेस करून प्रयागराज पोलिसांची मदत घेऊन बीड पोलिसांनी अखेर त्याला गाठलं. फरार झाल्यानंतर 6 दिवस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केला. तो एक दिवसही एका ठिकाणी राहिला नाही. त्यांनी हॉटेल देखील बदलली होती. पोलीसांची पथके देखील त्याला शोधत होती. त्याने त्याचा मोबाईल नंबर बंद केला होता. त्यानंतर त्याने एक नवीन मोबाईल स्वतःकडे ठेवला होता. तो मोबाईल नंबर मिळाल्यामुळेच खोक्याला पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आलं. या काही दिवसांमध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी लपत फिरत होता, अशी माहिती समोर आली आहे.

खोक्या 6 दिवस होता कुठे?

खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याने पळ काढला आणि पुणे गाठलं.पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने शिरूर कासार परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि अहिल्यानगर गाठलं. एक दिवस अहिल्यानगरला मुक्काम केला. नंतर त्याने संभाजीनगर गाठलं आणि तिकडूनच त्याने प्रयागराजला जाण्यासाठी ट्रॅव्हल पडकडली आणि प्रयागराज गाठलं. काल प्रयागराज वरून तो विमानाने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला प्रयागराज पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. या पूर्ण वेळी त्याच्या सोबत आणखी एक व्यक्ती होता. पण विमानानं जायचे म्हणून त्याने त्याला आधीच सोडलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

प्रयागराजमध्ये आठवडाभर थांबण्याची तयारी

खोक्या भोसलेच्या मारहाणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर तो फरार झाला होता.  गळ्यात सोने, पैशाची उधळण, व्हीआयपी वाहने, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे खोक्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने अंगावरचं सगळं सोनं काढलं. तो प्रयागराजला पोहोचला. सोबत पाठीवर एक पिशवी होती. त्याचबरोबर तो आठवडाभर तेथेच थांबण्याची तयारीत होता अशी माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर वन विभागाने खोक्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली. यात वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता; परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=KL8KFM0JOFU

अधिक पाहा..

Comments are closed.