पनवेल हादरले! बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली, इको चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
मुंबई गुन्हा: राज्यात पुण्यात स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर झालेला असताना पनवेलमध्ये कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर इको चालकाने बसस्टॉपवर सोडतो असे सांगत गाडीत बसवले, त्यानंतर अज्ञात स्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर मुलीने आज (15 मार्च) तिच्या पालकांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपी अमोल पदरथवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Panvel Crime)
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत आहे. इको चालकाकडून झालेल्या या घटनेनंतर मुंबई हादरली आहे. महाराष्ट्राच्या राजधानी तरुणी विशेषत: तरुणी सुरक्षित प्रवासासाठी इको, कॅब, बस यासारख्या वाहनांचा वापर करतात. मात्र, तिथेच तरुणींना सुरक्षेची भीती निर्माण झाली आहे. पनवेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली या प्रकरानंतर घाबरलेल्या विद्यार्थीनीने आपल्या आईवडिलांनाही घडल्या प्रकाराबद्दल सांगितले नव्हते. अखेर आज ही धक्कादायक बाब उघड झाली.
पनवेलमध्ये बसस्टॉपवर सोडतो म्हणत अत्याचार
पनवेलमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर इको चालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. १० दिवसांपूर्वी झालेल्या अत्याचाराबद्दल मुलीने आज पालकांना सांगितल्या नंतर सदरचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अमोल पदरथ वर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. सकाळी कॅालेजला निघालेल्या विद्यार्थीनीला बसस्टॅाप वर सोडतो असे सांगून आरोपीने गाडीत बसविले. यानंतर अज्ञात स्थळी गाडी घेवून जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. या प्रकारानंतर घाबरलेल्या विद्यार्थीने कुटूंबांना सांगितले नव्हते. अखेर आज सदरची बाब सांगितल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बुलढाण्यात महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकानेच केला विनयभंग
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर (Crime News) कारवाई केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. परिणामी पिडीत महिला वाहाकाने शेगाव बस स्थानकासमोर गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू करत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही या निमित्याने चर्चेत आला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.