नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर साधला निशाणा
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटविण्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे. मात्र, नागपुरातील याच आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळल्याचे पाहायला मिळाले. नागपूरच्या (Nagpur) चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परसिरात जाळपोळ व दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. त्यातच, मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले जात असल्याचा दाखला देत सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवर आज विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करत घटनेची माहिती दिली. आता, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवायझी यांनी नागपूर घटनेवर प्रतिक्रिया देताना नाव न घेता मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून हे वक्तव्य केलं जात आहे, ते पाहायला हवं. सर्वात मोठं भडकाऊ वक्तव्य सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून केलं जात आहे. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचीही त्यांना जाणीव नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काही बादशहांचे फोटो जाळण्यात आले. मात्र, त्याचा कुठेही परिणाम झाला नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला. त्यामुळे, कुराणवर जे लिहिलं जातं ते एका कपड्यावर लिहिलं होतं, तो कपडा जाळला. यासंदर्भात हिंदू व मुस्लीम लोकांनी पोलिसांकडून जाऊन हे थांबवा, अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी कुठलीही अॅक्शन घेतली नाही, त्यानंतर रात्री हिंसाचार घडला. मी त्या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, मंत्र्यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे, असे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले.
नागपूरमध्ये जी घटना घडली तो परिसर केंद्रीयमंत्र्यांच्या घराजवळ असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील याच शहरातून येतात. त्यामुळे, हे इंजेलिजन्सचं फेल्युअर आहे. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही तुमची आयडॉलॉजी बाजुला ठेवा. सध्या तुमची आयडॉलॉजी ही संविधान असली पाहिजे, तुम्ही संविधानाचे अनुकरण करुन सरकार चालवले पाहिजे, असेही औवेसी यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले.
व्हिडिओ | नागपूर हिंसाचारावर, आयमिम चीफ असदुद्दीन ओवैसी (@Asadowaiasi) म्हणतात, “गेल्या काही आठवड्यांत आम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची विधाने पाहण्याची गरज आहे. सर्वात मोठी चिथावणी सरकारकडून येत आहे. त्यांना जबाबदारीही वाटत नाही. सम्राटाची छायाचित्रे… pic.twitter.com/yd44kfwdpy
– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) मार्च 18, 2025
नितेश राणेंना शांत राहण्याचे निर्देश
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे बजावले आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले.
हेही वाचा
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
अधिक पाहा..
Comments are closed.