राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेचं पुढे काय? शिवसेना युतीबाबत सकारात्मक, पण मनसेची वेट अ
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात राज्यातील मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) या दोन पक्ष एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चाचं आणि युतीचं पुढे काय अशा चर्चा आता होताना दिसत आहेत. युतीच्या चर्चेला सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आणि आता सुद्धा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सुरुवात करावी आपण सकारात्मक असल्याची ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली होती. मात्र, मुलाखतीतून एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करणारे राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात मुलाखतीनंतर कुठलेही भाष्य केलं नाही. तर नेत्यांकडून सुद्धा राज ठाकरे हे या सगळ्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीच्या चर्चांचे पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे
राज ठाकरेंची मुलाखत अन् वक्तव्य
19 एप्रिलला प्रसारित झालेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना फुटली तरी आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता का? यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंना सोबतीची साद घातली. महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आमच्यातली भांडण, वाद छोटा असल्याचं सांगितलं… एकत्र येणे आणि एकत्र राहणं फारसं कठीण नाही. आता प्रश्न इच्छेचा असल्याचा राज ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी मंदिर नाट्य मंदिरात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी एकत्र येण्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
किरकोळ भांडण विसरायला मीही तयार आहे आणि मराठी माणसाच्या हितासाठी मी सुद्धा एकत्र येण्याचा आवाहन करतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी हे म्हणत असताना अटी शर्ती सुद्धा समोर ठेवल्या… यामध्ये त्यांनी अट ठेवली कीं “तुम्ही आधी ठरवा की भाजपसोबत जायचं की माझ्यासोबत? “, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेश दौऱ्याला गेल्याने युतीच्या चर्चा थंडावल्या, तर या संदर्भात राज ठाकरे परदेशातून परत आल्यानंतर बोलतील असं म्हणत इतर मनसे नेत्यांना सुद्धा याबाबत बोलण्यास मनाई केली होती.
तर याच दरम्यान 26 एप्रिल ला ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत एक्स हॅण्डल वरून “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” असं म्हणत पुन्हा एकदा मनसे शिवसेनेच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू ठेवली. दोन्ही ठाकरे बंधू परदेशातून परत आल्यानंतर यासंबंधी पुढे काहीतरी चर्चा होईल असं वाटत असताना सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी युती संदर्भात राज ठाकरेंच्या मैदानात चेंडू टोलावला आहे. युतीची पहिली चर्चा राज ठाकरेंनी सुरू केली आणि त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा सुरू करतील, ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत त्यांच्या जुन्या नातेवाईकांशी चर्चा करत आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत भेटी घेऊन आपले संबंध संपले असं कदाचित ते म्हणत असतील त्यानंतर आम्ही आहोतच असं म्हणत पुन्हा एकदा आपण युतीसाठी सकारात्मक असल्याचा दाखवलं. मात्र या सगळ्या युतीच्या चर्चा पुढे काय होणार हे जेव्हा मनसेच्या नेत्यांना आपण विचारलं तेव्हा त्यावर सगळ्या निर्णय योग्य वेळी राज ठाकरेच घेतील अशी प्रतिक्रिया नेत्यांकडून आली आहे.
ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची 17 मे रोजी बैठक होणार आहे. शिवसेना भवन येथे आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी 1 वाजता दादर येथील शिवसेना भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीवर त्याचप्रमाणे पुढील महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.