व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभा

मुंबई : व्हिएतनामच्या कंपनीने महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व एमएमआरडीए यांच्यासोबत सामंजस्य करार झाला आहे. विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरु झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होणार आहे. कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार

5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव असून मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात येणार आहे. 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.  स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे.

25000 हून अधिक तरुणांना थेट रोजगाराची संधी मिळणार

व्हिएतनाममधील आघाडीची विन ग्रुप जॉइंट स्टॉक कंपनी (Vingroup) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटी, शाश्वत नागरी विकास आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची (काही अहवालांनुसार 8.5अब्ज डॉलर्स) मोठी गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे 25000 हून अधिक तरुणांना थेट रोजगाराची संधी मिळणार आहे

विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास होण्यास मदत होणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल. राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबईरायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल.”(CM Devendra Fadnavis)

आणखी वाचा

Comments are closed.