अमित ठाकरेंवर पहिली केस, भावाच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले, मोडून काढू ही दादाग
आदित्य ठाकरे अमित ठाकरेंवर: नवी मुंबईतील नेरुळ येथे चार महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी रविवारी कोणतीही परवानगी न घेता केले. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेली ही पहिलीच केस आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आपल्या भावासाठी मैदानात उतरले आहेत.
Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाऊ आदित्य ठाकरेंची पोस्ट
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! चार महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं. महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय.
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला… https://t.co/8gWzIzluBm
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 17 नोव्हेंबर 2025
Amit Thackeray: नेमकं प्रकरण काय?
नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळचा शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून तयार असूनही अनावरण न करता कापडाने झाकून ठेवला होता. कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांना ही बाब कळताच, त्यांनी मनसैनिकांसह तात्काळ पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी मनसैनिक आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले की, मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो.मला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे. त्यावर आता धूळ साचत आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून, लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळ खात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.