‘खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात चोरी’

आदित्य ठाकरे भाजपवर खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपावालेच आहेत. जर हिम्मत असेल तर पहिले जाऊन अयोध्येमध्ये भाजपने मंदिराला का लुटलं याच्यावर प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवा. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बनले, भाजपने ना शासन केले ना कायदा आणला, पण भाजप क्रेडिट घेऊ इच्छिते, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.  वाराणसीमध्ये अनेक मंदिरे तुम्ही कॉरिडॉरच्या नावाखाली सपाट केली आहेत. काल काली मातेचे मंदिर त्यांनी युपीमध्ये पाडले. मुंबईतही मुंबा देवीच्या परिसरात कॉरिडॉरच्या नावाने भाजप जमिनी हिरावून घेऊ इच्छिते, त्याच्या विरोधातही आम्ही लढू, असा इशारा त्यांनी दिला.

स्वतःचे भाजपचे संविधान या देशात आणायचे आहे

आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप मेजॉरिटी मार्कच्या खाली आहे, देशाच्या जनतेने त्यांना 240 केलं आहे. भाजपच्या मनात जी घृणा आहे ती आपल्या संविधानाबद्दल आहेत्यांना संविधान बदलायचे आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाऐवजी स्वतःचे भाजपचे संविधान या देशात आणायचे आहे आणि त्यासाठीच डीलिमिटेशन असो किंवा संविधान बदलण्याचे कार्यक्रम असो, सर्व खासदारांना किंवा आमदारांना खरेदी केले जात आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये जी लूट झाली आहे तिथूनच भाजपने पैसा चोरला आहे. उज्जैनमध्ये जी लूट आहे तिथूनच भाजप पैसा चोरत आहे. राम मंदिर बनल्यानंतर भाजपने जी ट्रस्ट बसवली, त्या दानपेटीतून तुम्ही धोतर सीसीटीव्हीवर लावून चोरी केली, असा आरोप आदित्य यांनी केला.

सीबीआय, आयटी हे भाजपचे पोपट आहेत

आदित्य ठाकरे म्हणाले की, सीबीआय, आयटी हे भाजपचे पोपट आहेत. इडीला चंपत राय दिसत नाहीत, इडीला आता शेखर सुमन दिसतील. त्यांनी प्रश्न विचारला की सीबीआय चंपतराय किंवा मिश्रा यांच्या घरी का जात नाही आणि या सर्वांत भाजप व पंतप्रधान महोदयांची भूमिका काय आहे?

‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ वरून टीका

भाजप नेत्यांनी आमिर खानला लक्ष्य केल्यावर ठाकरे म्हणाले की, आमिर खानचे फोटो तर मोदी साहेबांसोबत आहेत, त्यांची चांगली मैत्री आहे. उज्जैनमध्ये ‘लँड जिहाद’ कोणी केला? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केला. उज्जैनच्या पावन भूमीला कोणी लुटले? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लुटले. आधीची भाजप जी अडवाणी, वाजपेयी साहेबांची, मुंडे काका-महाजन काकांची होती ती बदलली आहे. सध्याचे भाजपचे प्रमुख चेहरे हे मिक्सिंग वाले, इथेनॉल मिक्सिंग वाले चेहरे आहेत.  देशाच्या जीवाला धोका असणाऱ्या “भेसळ”सारख्या विषयावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.