मटण खाता म्हणून मराठी माणसांना घर मिळत नाही; आदित्य ठाकरेंनी सांगितला मराठीवरील अन्याय
मुंबई : राज्याच्या विधिमंडळ सभागृहात आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्यावतीने सत्कार करण्यात आला. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये (mumbai) मराठीच्या अस्मितेसाठी मनसेच्या पुढाकारात महाराष्ट्र एकीकरण समितीने विराट मोर्चा काढला होता. त्यामुळे, मीरा भाईंदरमध्ये मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादावरुन सध्या वातावरण तापलं असताना सरन्यायाधीशांनी संघराज्यसंदर्भात भूमिका मांडली. तर, दुसरीकडे मराठीच्या (Marathi) मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आपला मराठीचा अजेंडा कायम ठेवला आहे. आमदार आदित्य हॅकेरे मध्ये आदित्य थक्करास आज मीरा भाईंदर येथील मोर्चाबाबत बोलताना मराठी माणसांवर महाराष्ट्रात अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे.
कोणाला मारहाण केली जाते, याचे समर्थन आम्ही करत नाही. पण, ते व्हिडिओ तुम्ही बघा तो सगळा विषय वेगळा आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मीरा भाईंदर येथील मोर्चासंदर्भात भाष्य केलं. मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघत होता, मग त्याला सरकारने परवानगी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावे, असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला. हा देश महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर चालतो, महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे, असेही त्यांनी म्हटलं.
मटण खाता म्हणून मराठी माणसांना घर मिळत नाही
महाराष्ट्रात मराठी माणसांवर खूप अन्याय होत आहे, तुम्ही मटण मांस खातात म्हणून घरं मिळत नाहीत, अशी वस्तूस्थिती आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली. मराठी आंदोलन हे मराठी प्रेमींच्या हातात जायला हवं, महाराष्ट्र प्रेमासाठी मुंबईतील मराठीच्या विजयी जल्लोष मेळाव्यात लोक एकत्र आले होते, असेही आदित्य यांनी सांगितले.
सरन्यायाधीशांना निवेदन
विधिमंडळ सभागृहात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला आहे, तेव्हा आम्ही विरोधी पक्षांकडून विरोधकांचा आवाज कसा दाबला जात आहे. याशिवाय विरोधी पक्ष नेते पदाचा नियुक्ती करण्यात आली नाही हे निदर्शनास आणून दिल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. सत्ताधाऱ्यांना भीती वाटते का? आम्ही पत्रातून हे सगळं अवगत केलं आहे. 4 पक्ष, दोन पक्षाच्या नावाने सुरू आहेत, हे सगळं निसतरण्याची गरज आहे. राज्यातील गडबड घोटाळा सरकार आम्हला घाबरताय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरन्यायाधीशांपुढे आम्ही आपलं गाऱ्हाणं मांडल्याचं सांगितलं.
सरकार तुमचं, तरीही रोहिंग्या कसे घुसले?
कुर्ला आयटीआयमध्ये झाड तोडणार होते, 9 हजार झाडें तोडणार होते, विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच ही झाडं लावली होती. ते म्हणताय, रोहिंग्या घुसले आहेत. मग, सरकार तुमचं आहे, तरीही ते घुसले कसे? तुमच्या केंद्र सरकारमुळेच हे रोहिंग्या घुसले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, ते म्हणताय रस्ता मैदान तिथं करायचा आहे. मग रात्रीतून तुम्ही वृक्षतोड का करताय? असा सवालही आदित्य यांनी विचारला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.