धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, शोध सुरू

सोलापूर : राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही, एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संताप असतानाच दुसरीडे अहिल्यानगरमध्ये अॅसिड हल्ला प्रकरणही समोर आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडलेल्या अॅसिड हल्ल्यातील आरोपीला अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही, त्यातच पंढरपुरात (Pandharpur) आणखी एका मुलीवर अॅसिड हल्ल्याची (Acid attack) धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, पीडित मुलीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना दुसरीकडे शहरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूर शहरांमध्ये एका तरुणीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव असून अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मुलीचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले असून आम्हाला एक फोन आला होता, तेव्हा आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो. इथं माझ्या मुलीवर अॅसिडसारखा पदार्थ टाकल्याचं समजलं. माझ्या मुलीवर टाकला तसा कुणावरही अॅसिड टाकू नका, असं भावनिक आवाहन पीडित मुलीच्या आईने केलं आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे.

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण

दरम्यान, जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे धनगर समाजातील मेंढपाळसहीत एका महिलेला काठीने मारहाण झाल्याची देखील घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून मारहाण झालेले मेंढपाळ बारामती तालुक्यातील असल्याची माहिती आहे. या मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी, पोलीस तक्रार करण्यात येत आहे.

हेही वाचा

BLOG : ॲसिड हल्ले, कायदा असूनही भीती का कायम?

आणखी वाचा

Comments are closed.