‘मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन ‘आंदोलनाची नौटंकी’ कशाला? आदित्य ठाक
आदित्य ठाकरे: ‘औरंगजेबाची कबर काढून टाका’ या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदूत्ववादी संघटना आज प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात येत असताना पुरातत्त्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिल्याने राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. औरंगजेबाचे उदात्तीकरण चालणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान औरंगजेबाची कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही नौटंकी आहे. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे. प्रशासन तुमचं आहे. मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि कबर हटवावी असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय. ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल ते औरंगजेब असो किंवा भाजप असो त्यांचं असं होईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray on Aurangzeb Tomb Protest)
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
‘औरंगजेब कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही नौटंकी आहे.केंद्र सरकार तुमचा आहे, राज्य सरकार तुमचा आहे प्रशासन तुमचा आहे… मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि कबर हटवावी आणि ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल ते मग औरंगजेब असो किंवा भाजपा असो त्यांचा असं होईल. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सुद्धा त्यांच्याकडे आहे, ASI नरेंद्र मोदी यांनी फोन लावा आणि कबर हटवावी. आज रात्रीच्या रात्री कबर हटवावी, मोदींच्या त्या हातात आहे .भाजपचे नेते आमदार खासदार जे असतील त्यांची जी मुलं आहेत. जे बाहेरगावी शिकतात त्यांना एकच राहणार आणि त्यांनी ही कबर हटवावी .त्यांना या ठिकाणच्या युवा वर्गाला एकत्र आणायचे आहे .आंदोलन करायचा आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कदाचित काहितरी त्यांचतात त्यांनी पाहिले असेल.औरंगजेब विषय झाला पण हे सरकार अनेक विषयात रमवू ठेवत आहेत. इतिहासात हे रमवून ठेवले जात आहे .जलपूजन का केले तर निवडणूक पालिकेच्या तोंडावर होत्या.यावेळी सुद्धा स्मारके घोषित केली आहेत. पण सद्याची स्थिती काय आहे, यावर विचार करणे गरजेचे आहे .आजच्या दिवशी कोरटकर आणि सोलापूरकर याना अटक करणार आहात का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. ही सगळी नौटंकी आहे. केंद्र शासन आणि प्रशासन यांचेच आहे. याना वाटत असेल तर प्रधानमंत्री यांनी फोन फिरवावा .म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लबोल केलाय.
दरम्यान, शिंदे गटातही औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले होते. आज तिथीनुसार छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे निमित्त साधत राज्यभरात छत्रपती संभाजीनगरजालना, जळगाव,नागपूर, कोल्हापूर, पुणे अशा ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजीसह वातावरण प्रचंड तापले होते. औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीचा पुर्नरावृत्ती करण्याचा इशारा देण्यात आला होता.
अधिक पाहा..
Comments are closed.