मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजे
अकोला : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या स्टोन क्रशर व्यवसायिक आणि अतिरीक्त जिल्हाधिकारी (collector) यांच्यातील वादात अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. तसेच, गुन्हा दाखल होताच त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नं. 270/2026 कलम 308 (2), 351 (1) BNS सहकलम 7 PCA नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोन क्रेशर उदयोजक विवेक प्रभाकर बिजवे (वय 62) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विवेक बिजवे हे स्टोन क्रशरचा व्यवसाय करत असून 19 मार्च 2026 रोजी त्यांचे स्टोन क्रशरच्या ठिकाणी, बार्शी टाकळी येथे बिके चौक MIDC 3 येथून जात असताना आरोपी प्रमोद गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे 15000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच इतर सदस्यांकडूनही 15,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोपी फिर्यादीत करण्यात आला आहे. जर मला पैसे दिले नाहीत तर तुमचे व्यवसाय बंद पाडील, अशी धमकी देखील गायकवाड यांनी दिली. त्यामुळे, तक्रारदाराने आरोपीस शासकिय निवासस्थानी जाऊन 15 हजार रुपये दिले. त्यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी आरोपीने फिर्यादीस फोन करून मी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार, फिर्यादीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात एक ऑडिओ क्लिपपुरावा म्हणून सादरही करण्यात आलाय. 9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सरकारकडून तात्काळ ही कारवाई करण्यात आली. खाण आणि स्टोन क्रशर मालकांना खंडणी मागण्याच्या आरोपावरुन अकोल्यातील एमआयडीसी पोलिसांमध्ये आज त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आठवडाभरापूर्वी खाण आणि क्रशर मालकांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरुन आज झाला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून सरकार निलंबनाची कारवाई करते का?, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
आणखी वाचा
Comments are closed.