नशेत गुन्हेगारीचा कहर, फावड्याने मारहाण, दुकाने उद्ध्वस्त; तापडिया नगरात नशेखोरीचा धुमाकूळ
चिम न्यूज: अकोला शहरातील तापडिया नगरातील मोहन भाजी भंडार चौकात एका नशेधुंद तरुणाने रस्त्यावर गोंधळ (Akola Crime News) घालून तीन ते चार दुकांनांची तोडफोड केली. फावड्याने लोकांवर हल्ला करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला शहरातील तापडिया नगर येथील मोहन भाजी भंडार चौकात सोमवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी राहणाऱ्या एक नशेच्या आहारी गेलेला तरुण अक्षरशः हैदोस घालताना दिसला. मोहन भाजी भंडाराजवळ या तरुणाने अचानक तीन ते चार दुकांनांची तोडफोड सुरू केली आणि फावड्यासारख्या धारदार हत्याराने लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
दुकानदारांनी घाबरून काढला पळ-
घटनेदरम्यान काही दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद करून पळ काढला, तर काहींनी धैर्य दाखवून पुढे येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी याच ठिकाणी राहणाऱ्या कल्लु तिवारी नामक हैदोस घालणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी अशा नशेखोर गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला असून, आरोपीने याआधीही असे प्रकार केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून सतर्कता वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
हातभट्टी दारू अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त
अकोल्यातील अकोट फैल आणि पातूर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सुरु असलेल्या हातभट्टी दारू अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या दोन्ही दारू हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली.. यावेळी शेताशिवारातल्या नदीकाठी अनधिकृतपणे गावठी दारुची हातभट्टी अकोला पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले. यादरम्यान दारू हातभट्टी चालकासह इतर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.