अकोल्यातील 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत दुष्कर्म करणाऱ्या नराधमाची पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली ‘म

अकोला: राज्यात एकीकडे नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून (Akola Crime News) सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन (Akola Crime News) अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार (Akola Crime News) केला आहे. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती. मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये (Akola Crime News) तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.(Akola Crime News) तर या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना माझ्या पतीने जर दुष्कृत्य केलं असेल तर त्याला फाशी व्हायलाच हवी, अशी मागणी केली आहे.
अकोल्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीने एबीपी माझावर ही मागणी केली आहे.

Akola Crime News : माझ्या पतीने जर दुष्कृत्य केलं असेल तर त्याला फाशीची…

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील एका दहा वर्षीय चिमुरडीवर साठ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तो फरार झाला. मात्र आरोपी जगराम आडे याच्या पत्नीने म्हटलं की, माझ्या पतीने जर दुष्कृत्य केलं असेल तर त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी.  ती फार छोटी मुलगी आहे, अशी मागणी एबीपी माझाच्या माध्यमातून केली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हती, मी कामावर होती. त्यामुळे खरी घटना मला माहिती नाही, मात्र माझ्या पतीवर जे आरोप लागले आहेत ते जर सत्य असतील तर त्याला फाशीच व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Akola Crime News :  कोणाला सांगितलं तर संपूर्ण परिवाराला संपवून टाकेल

घटना घडल्यानंतर आरोपीने घरात घुसून पीडित मुलीच्या आईला धमकावलं. जर घटनेबद्दल कोणाला सांगितलं तर संपूर्ण परिवाराला संपवून टाकेल अशी धमकीही दिली. घटनेनंतर पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं गुन्ह्याची गंभीरता बघून पोलिसांनी तात्काळ पुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली. मात्र अद्यापही आरोपी फरार आहे व त्यापासून आम्हाला धोका आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने असे प्रयत्न केले आहेत, आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या परिवारातील व्यक्तींनी केली आहे.

Akola Crime News :  नेमकं काय घडलं?

चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १० वर्षीय मुलीवर एका ६० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ५ मे समोर आली. या प्रकरणातील संशयित आरोपी जगराम गोविंदा आडे (६०) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेले असताना मुलगी घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.कोणाला याबाबत काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, सायंकाळी मुलीने आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर, त्यांनी तत्काळ चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.