अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय मालोकारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये भरती-ओहोटी पाहायला मिळत आहे. भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू करण्यात आलंय. तर, काँग्रेसमध्येही पक्षप्रवेश होत आहेत. अकोल्यात (Akola) आज शिवसेना शिंदे (Shivsena) गटातील ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत माजी जिल्हाप्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्कप्रमुख विजय मालोकार यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश झाला.
शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका बसलाय. पक्षाचे जेष्ठ नेते, माजी जिल्हाप्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्कप्रमुख विजय मालोकार यांनी आज सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिलाय, असे त्यांनी यावेळी म्हटले. विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत.

शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे (एसटी) संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. 1999 मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. त्यात त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होताय. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढली होती. यात 2004 मध्ये ते अप्क्ष म्हणून 40 हजार मते मिळवत अल्प मतांनी पराभूत झाले होतेय.  2009 मध्ये ‘जनसुराज्य पक्षा’चे उमेदवार म्हणून मालोकारांनी 30 हजार मते घेतली होतीय. मालोकार यांच्याकडे उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहेय.

विजय मालोकारांची राजकीय कारकिर्द :

अकोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख.

1995 मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक.

1999 मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी.

2004 मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव. अपक्ष उमेदवार म्हणून घेतली होती 40 हजारांवर मते.

2009 मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून 30 हजार मतं घेतलीत.

काही काळ मनसे जिल्हाप्रमुख आणि भाजपमध्ये असतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी.

हेही वाचा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई

आणखी वाचा

Comments are closed.