अलेक्झांडर झ्वेरेवने इतिहास रचला, एका वर्षात मिळवले 70 विजय
टेनिस विश्वातील अव्वल खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेवने आपल्या कारकीर्दीत आणखी एक इतिहास रचला आहे. एका पॅलेंडर वर्षात किमान 70 विजय नोंदवणारा तो या शतकातील बारावा खेळाडू ठरला आहे. गुरुवारी बोलोग्ना येथे ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या जर्मनीच्या डेव्हिस कप फायनल्सच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात आर्थर फेरीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवून त्याने हा टप्पा गाठत जर्मनीच्या स्टार टेनिसपटूने पुरुषांच्या टेनिसमधील महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही आपल्या सर्वोत्तम हंगामात 70 किंवा त्याहून अधिक सामने जिंकले आहेत. झ्वेरेवने 2024 मध्ये 69 सामने जिंकले होते, मात्र या वर्षी त्याने त्याहूनही सरस कामगिरी करत 70 विजयांचा आकडा पार केला. 2026 चा हंगामात अलेक्झांडरने फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन जिंपून आपल्या कारकीर्दीतील पहिली दोन ग्रँडस्लॅम पटकावली.
Comments are closed.