हिंदूंना ‘वेचून’ मारणाऱ्या त्या मारेकऱ्यांचे मुडदे कधी पाडणार? अंबादास दानवे यांचा सरकारला संतप्त सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 एप्रिल 2026 ला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभरापूर्वी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. अद्याप या हल्ल्यातील मुख्य आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राजकारणासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा, ज्यांनी कुंकू पुसण्याचे कुकर्म केले त्यांना यमसदनी कधी धाडणार? असा सवाल दानवे यांनी X वर पोस्ट शेअर करत केले आहेत.

”सध्या देशात अफवांचे पेव फोडून आणि खोट्या आंदोलनांचा बाजार मांडत फिरणाऱ्या भाजप सरकारला तब्बल ११ महिन्यांनंतर जाग आली. पुण्याच्या असावरी जगदाळे या एका भगिनीला नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन ‘कर्तव्य’ पार पाडल्याचा आव आणला गेला. पण हा प्रश्न एका नोकरीपुरता मर्यादित आहे का? ​न्यायाची प्रतीक्षा की केवळ आश्वासनांची खैर? पहलगाममध्ये ज्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, ज्यांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसायला सरकारला वर्ष का लागते? ​आंदोलनांचा इव्हेंट कशासाठी? रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची हौस असणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदा पहलगामच्या पीडितांच्या डोळ्यात डोळे घालून सांगावे, न्याय कधी मिळणार? ​भाजपने आपल्या आंदोलनाच्या गदारोळात हे स्पष्ट करावे की, हिंदूंना ‘वेचून’ मारणाऱ्या त्या मारेकऱ्यांचे मुडदे कधी पाडणार? राजकारणासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा, ज्यांनी कुंकू पुसण्याचे कुकर्म केले त्यांना यमसदनी कधी धाडणार?”, असे सवाल दानवे यांनी या पोस्टमधून केंद्र सरकारला केले आहेत.

Comments are closed.