घायल हूँ इसिलिये घातक हूँ, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर रोहित पवार यांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची न्यायालयाने सुटका केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘घायल हूँ इसिलिये घातक हूँ’ असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी याबाबत न्यायायलयाचे आभारही मानले आहेत.

”न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं मी पहिल्यापासून सांगत होतो. त्यानुसार अखेर घोटाळ्याच्या आरोपातून वगळत ईडीच्या फेऱ्यातून न्यायालयाने सुटका केली, याबाबत नायालयाचे मनापासून आभार. सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं..’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पण या प्रकरणात जो काही नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला, त्यावरून आता यापुढच्या पावलाबाबत एवढंच सांगायचंय, “घायल हूँ, इसलिए घातक हूँ”, असा सूचक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. दिव्य मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.