आशिष शेलारांच्या कार्यालयाच्या बाहेरूनच अमित ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये सत्ता दिली, आता मुंबईत..
Amit Thackeray Meets Ashish Shelar: भाजप नेते व मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज भेट घेतली. ही भेट सकाळी 9.30 वाजता वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात झाली. या भेटीत, गणेश उत्सव कालावधीत होणाऱ्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा तात्पुरत्या रद्द करून त्या पुढे ढकलाव्यात, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. या संदर्भात एक निवेदनही आशिष शेलार यांना देण्यात आले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांसंबंधी इतर काही महत्त्वाच्या मागण्यांचाही समावेश आहे. तर या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या एका वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या कार्यालयाच्या अंगणात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई पाहायला मिळाली. रस्त्यावर खड्डे पाहायला मिळाले. याबाबत अमित ठाकरे यांना प्रश्न विचारला असता नाशिकमध्ये संधी दिली. मुंबईत ही संधी द्या, असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे.
नेमके काय म्हणाले अमित ठाकरे?
अमित ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा मुंबईत पाणी साठले नाही. मी वारंवार म्हटले आहे की, यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे. नाशिकमध्ये सत्ता दिली तेव्हा पाहिलं ना काय काम झालं, आता मुंबईत ही संधी द्या, असे त्यांनी म्हटले आहे. आता अमित ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुंवया उंचावल्या आहेत.
वैयक्तिक दुरावा कधीही निर्माण झालेला नाही : अमित ठाकरे
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. याबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, मला असं वाटत नाही की ते कधी दुरावले होते. राज साहेब आणि आशिष शेलार हे खूप जुने मित्र आहेत. ज्या टीका होतात त्या राजकीय होतात. कधीही वैयक्तिक टीका होत नाही. राजकीय टीका केल्याच पाहिजेत. विरोधी पक्षाने सरकारवर काही चुकत असेल तर टीका केल्याच पाहिजेत. आमचे जरी काही चुकत असेल तर त्यांनी देखील आम्हाला समजावले पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक दुरावा कधीही निर्माण झालेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=yaiwxa5uf-k
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.