अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा घराचा आहेर
अजित पवार यांच्या निधनाची बातमी : अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत (Ajit Pawar Death News) सरकारने दहा मे पर्यंत भूमिका स्पष्ट करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी. अन्यथा सरकारला हे महागात पडणार, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या(Ajit Pawar) अपघाताचा तपास करायला सरकार खूप दिरंगाई करत आहे. ही दिरंगाई का करत आहे, हे मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. असं म्हणत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सरकारलाf घरचा आहेर दिलाय.
ज्या पद्धतीने खरात प्रकरणाचा तपास केला जातो त्या पद्धतीने अजित पवारांच्या अपघाताचा तपास का केला जात नाही? की सरकारलाच याचा तपास करायचा नाही, हे एकदा स्पष्ट करावे. असे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. अजित दादांसारखा इतका मोठा नेता आपल्यातून निघून जातो आणि एक एफआयआर होऊ शकत नाही? असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी :…..अन्यथा जनआंदोलन उभा करणार
अजित पवारांचा तपास व्हावा यासाठी जनआंदोलन उभा करणार असल्याचंहे अमोल मिटकरी म्हणालेत. तसेच रोहित पवार यांनी प्रचारादरम्यान भाजपवर निशाणा साधला, यावर देखील भाष्य त्यांनी केलंय. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आमदार अमोल मिटकरी बारामतीत आले असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करत अभिप्राय दिलीहे.
Amol Mitkari : अजित पवारांनी भाजप नेत्यांना बारामतीत हस्तक्षेप करू दिला नाही
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील इतर नेते उपस्थित होते. उद्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. जोपर्यंत अजित पवार हयात होते तोपर्यंत अजित पवार जरी भाजपसोबत गेले तरी अजित पवारांनी भाजप नेत्यांना बारामतीत हस्तक्षेप करू दिला नाही. भाजप नेत्यांना कधीही बारामतीत प्रचाराच्या सांगता सभेला येऊ दिल नाही. मात्र, उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची सांगता सभा पार पडणार असल्याचे हे मिटकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.