पहिले हाताचा पंजा छाटला, तो रस्त्यावर टाकून तरुण पळत सुटला; पुढे भयंकर घडलं, अमरावतीमधील थरकाप

Amravati Crime News अमरावती: अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण अमरावती (Amravati News) शहर हादरून गेले आहे. आफक शेख या तरुणाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. थरकाप उडवणारी माहिती म्हणजे आफक शेख याला संपवण्याआधी त्याचा हाताचा पंजाच छाटण्यात आला. सदर घटनेने संपूर्ण अमरावती हादरुन गेली आहे.

नेमकं काय घडलं? (Amravati Crime News)

राजेंद्र नगर बेलोकर हॉस्पिटलजवळ आफक शेख या ताज नगर येथील तरुणाची चार अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली. हत्येपूर्वी या तरुणांनी या युवकाचा हाताचा पंजा छाटून टाकला. पंजा छाटल्यानंतर पळत सुटलेल्या आफाक शेखवर कोयत्याने जोरदार वार केले, या हल्ल्यात आफक शेख या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. भररस्त्यात हाताचा पंजा सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेतील आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मुंबईत प्रेम प्रकरणातून एका 17 वर्षीय तरुणीची हत्या- (Mumbai Crime News)

मुंबईच्या कांदिवली सामता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी समता नगर पोलिसांची मोठी कारवाई केली. अल्पवयीन मुलीचा प्रियकरानी मुलीचा चाकूने गळा कापून हत्या करून जंगलात मृतदेह फेकून दिला होता. जंगलात वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून पेट्रोलिंग करत असताना अनोळखीचा मृतदेह सापडला. या संदर्भात वन विभागाकडून समता नगर पोलिसांना माहिती देण्यात आली, समता नगर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मृतदेह  शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हरवलेली मुलींचे शोध सुरू केला, अवघ्या काही तासांमध्ये मुलीचं ओळख पटवून समता नगर पोलिसांनी हत्येचा उलगडा लावला. मुलीच्या हत्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी आरोपी सूरज वाघमारे (22) याला अटक केली आहे, अटक आरोपी हा कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने चाकूने गळ्यावर वार करून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

रायगडमध्ये 5 वर्षीय मुलीची हत्या- (Raigad Crime News)

पेनमधील पाटनेश्वर आदिवासी वाडीतील एका 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण भिकू वाघमारे असं संशयित आरोपीचे नाव असून पोलिस या प्रकरणी चौकशी करत असून या हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?

Navi Mumbai Crime : 11 महिन्यांनंतर ऐरोलीतील ‘मर्डर मिस्ट्री’ उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला

Comments are closed.