अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम का

आंगकृष्ण रघुवंशी KKR वि LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला.  सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. दरम्यान, कोलकाता आणि लखनौच्या या सामन्यात कोलकाताचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीच्या (Angkrish Raghuvanshi Run Out) विकेटची चर्चा रंगली आहे.

अंगक्रिश रघुवंशीच्या बाद होण्यावरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न केलेल्या अंगक्रिश रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) नॉन स्ट्राइकवरील कॅमरुन ग्रीनने माघारी पाठवले. पुन्हा माघारी धावताना अंगक्रिश रघुवंशीने सूर मारली. यावेळी मोहम्मद शमीने यष्टीरक्षकाच्या दिशेने मारलेला चेंडू अंगक्रिश रघुवंशीला लागला. यावर लखनौचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि गोलंदाज मोहम्मद शमीने अंपायरकडे दाद मागितली आणि अंगक्रिश रघुवंशीला Obstructing The Field या नियामनूसार बाद देण्याचा निर्णय जाहीर झाला. अंगक्रिश रघुवंशीला बाद देताच मैदानात राडा पाहायला मिळाला. केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर आणि अंपायरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. (Angkrish Raghuvanshi KKR vs LSG IPL 2026)

Obstructing The Field नेमका नियम काय? (What rule regarding ‘Obstructing the Field’?)

क्रिकेटमध्ये शेतात अडथळा आणणे हा फलंदाज बाद होण्याचा एक विशेष प्रकार आहे, ज्याला मराठीत “मैदानात अडथळा निर्माण करणे” असे म्हणतात. या नियमानुसार, जर फलंदाजाने जाणीवपूर्वक (इच्छेने) क्षेत्ररक्षकांच्या खेळात अडथळा आणला, तर त्याला बाद दिले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर फलंदाजाने चेंडू स्टंपकडे जात असताना हाताने किंवा बॅटने अडवला, किंवा क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार असताना त्याच्या मार्गात जाणूनबुजून अडथळा निर्माण केला, तर हा नियम लागू होतो. मात्र, हा अडथळा अपघाताने झाला असेल तर फलंदाज बाद दिला जात नाही, कारण या नियमात “जाणीवपूर्वक” कृती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) यांनी तयार केलेल्या क्रिकेटच्या नियमांमध्ये (Law 37) समाविष्ट आहे आणि खेळातील प्रामाणिकपणा व निष्पक्षता राखण्यासाठी तो अत्यंत आवश्यक मानला जातो.

संबंधित बातमी:

Angkrish Raghuvanshi Wicket Controversy : अंगकृष रघुवंशी OUT की NOT OUT?, विकेटचा असा कोणता नियम जो कोणालाच कळला नाही, कोच नायर थेट अंपायरला भिडला

Angkrish Raghuvanshi Wicket Controversy : अंगकृष रघुवंशीच्या वादग्रस्त विकेटवरून राडा; बॅट-हेल्मेट दिले फेकून, तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर गदारोळ, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.