गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, कोण कारवाई करणार? अनिल परबांचा फडणवीसांना स

Anil Parab Vs Yogesh Kadam: महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरावायला लाज वाटत नाही का, असा सवाल ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी उपस्थित केला. अनिल परब हे मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा (Dance Bar) मुद्दा पुन्हा उचलून धरला. यावेळी अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम (Yogesh Kadam) या पितापुत्रांना खडे बोल सुनावले.

सावली या बारविषयी खुलासा करताना रामदास कदम म्हणाले, हा बार माझ्या पत्नीच्या नावाने आहे. त्यामुळे आता बारची मालकी कोणाकडे आहे, याबद्दल कोणताही संभ्रम राहिलेला नाही. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्याखाली. हे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर रेड करायला जातात. का तर अश्लीलता पसरते म्हणून, अनैतिक धंदा आहे म्हणून, समाजविघातक कृती म्हणून हे रेड करतात. त्याला हरकत नाही, हे चांगलं काम आहे. पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार?, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला जो बार आहे, तिकडे बारबाला नाचवल्या जात होत्या, अश्लील नृत्य केले जात होते, पैसे उडवले जात होते. ही सगळी माहिती पोलीस रेकॉर्ड आणि एफआयआरमध्ये आहे. मला माहितीच्या अधिकारातंर्गत ही माहिती मिळाली. त्यामुळे ती खोटी असू शकत नाही. त्यानुसार धाड पडली तेव्हा बारमधील 22 बारबाला, 22 गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. माझा उल्लेख कदम यांनी ‘अर्धवट वकील’ म्हणून केला आहे. विधानसभेत मी अर्धवट वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो, ही माझी चौथी टर्म आहे. त्यामुळे मला विधानसभा नियम आणि कायदे चांगले माहिती आहेत. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.

Anil Parab: मी सगळी कागदपत्रं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार, कारवाईची मागणी करणार: अनिल परब

सावली बारवर कारवाई झाल्यानंतर कदम पितापुत्र म्हणतात की, आम्ही तो बार चालवायला दिला होता. तुमच्या नोकराने किंवा ज्याला प्राधिकृत केलं तर चुकीच्या कृत्याची जबाबदारी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होतो. पण कायद्यानुसार, प्राधिकृत आहे तो जबाबदार असला तरी हे कृत्य मी केलं, असे परवानाधारकावर बंधनकारक आहे. अन्यथा तुम्ही प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं, हे सिद्ध करावे लागते. सावली बारवर यापूर्वी दोनवेळा कारवाई झाली होती. तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, पोरी नाचवतात, तरीही कोणतेही पावले उचलली नाही, त्यामुळे तुमची थेट जबाबदारी सिद्ध होते, याकडे अनिल परब यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मी आजच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्याचे सगळे प्रताप भेटरुपाने देणार होतो. पण ते आज मुंबईत नाहीत. उद्या ते मुंबईत आल्यावर मी त्यांच्याकडे सगळी कागदपत्रं देईन. सावली बार हा कदम यांच्या पत्नीच्या नावे हे मान्य आहे. पण डान्सबारचे सर्व नियम तुडवले गेले. ऑर्केस्टासाठी पाच मुलींची परवानगी असताना 14 मुली सापडल्या. नृत्य करताना मुली लगट करत होत्या, हे सगळे पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=akdjodvhxxy

आणखी वाचा

होय, ‘सावली बार’ माझ्या पत्नीच्या नावावर, पण…; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.