मुंडेंचा सहभाग नव्हता, हे मी मान्यच करत नाही, वाल्मिक कराडला त्यांनीच मोठं केलं : अंजली दमानिया
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राजकीय दबाव होता, हे आजच्या पोलिसांच्या चार्जशीटवरून सिद्ध झालं आहे. कारण या प्रकरणातील घटना ज्याप्रमाणे वेगवेगळ्या करण्यात आल्या त्यातील खंडणी प्रकरण वेगळं, खून आणि हत्या प्रकरण वेगळं, ॲट्रॉसिटी वेगळी अशा पद्धतीने जी प्रकरणा वेगवेगळी करण्यात आली ती मुळात राजकीय दबावापोटी करण्यात आली. आम्ही पहिल्या दिवसापासून हे प्रकरण एकच असल्याचे वेळोवेळी सांगत आले आहोत आणि ही संघटित गुन्हेगारी असून त्यातूनच ही हत्या झाली असल्याची प्रतिक्रिया देत सामाजिक कार्यकर्ताअंजली दमानियांवर (Anjali Damania) यांनी या प्रकारणावर भाष्य केलं आहे.
दरम्यान, राज्यात राजकीय दहशत असावी तरी किती? हे यातून दिसून आले आहे. किंबहुना या प्रकरणात जर कोणी म्हणेल की यात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता, तर ते मी कधीही माणूच शकतं नाही. वाल्मिक कराड (Walmik Karad) आज मोठं होण्या मागचं कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच (Dhananjay Munde)आहे. त्याच्या शिवाय दुसरा तिसरा कोणीही नाहीये. असा घणाघात देखील अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
ही संघटित गुन्हेगारी असून त्यातूनच देशमुखांची हत्या- अंजली दमानिया
ज्यावेळी अवादा कंपनीतील कर्मचाऱ्यांचे अपहरण झालं. त्यानंतर बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यात पैसे मागितले गेलेत. तिथपासून न झालेली कारवाई, 29 नोव्हेंबरला धमकीच फोन आणि झालेलं पूर्ण प्रकरण, तसेच 6 तारखेला झालेली मारहान, 9 तारखेला झालेली हत्या हे सर्व प्रकरण एकच आहे. तसेच यातील सूत्रधार हे एकच आहेत. असेही अंजली दमानिया म्हणाल्या. चार्जशीटमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 7 आणि 8 तारखेला वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात जी चर्चा झाली त्यात ते असं म्हणतात की खंडणी प्रकरणात उद्या जर कोणी उठेल आणि आपल्याला प्रतिकार करेल तर त्याला आपण धडा शिकवला पाहिजेल. ही वृत्ती दहशत निर्माण करणारी होती. आपल्यामध्ये कोणी आलं तर त्याला संपून टाकायचं ही मनोवृत्ती या आरोपींची होती. आणि याबद्दलच पहिला दिवसापासून आम्ही आणि देशमुख कुटुंबीय सातत्याने बोलत होतो.
धनंजय देशमुख यांनी अतिशय संयम राखून हे प्रकरण हाताळलं– अंजली दमानिया
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अतिशय संयम राखून हे प्रकरण हाताळलं. त्यात त्यांनी कधीही आपल्या मनातला राग बोलून दाखवला नव्हता. एकीकडे सबंध महाराष्ट्र या प्रकरणाने हदरला होता. राजकीय दहशत किती हे यातून दिसून आले होते. मात्र जर कोणी म्हणेल की यात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता तर ते मी कधीही माणूच शकतं नाही. वाल्मीक कराड आज मोठं होण्या मागचं कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहे. त्याच्या शिवाय दुसरा तिसरा कोणीही नाहीये. असा घनाघात देखील अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
आडवा आला तर त्याला धडा शिकवा हे वक्तव्य अतिशय क्लेशदायक – अंजली दमानिया
या संपूर्ण प्रकरणात मस्साजोग ग्रामस्थांनी जी साथ देशमुख कुटुंबीयांना दिली, त्यांच्या कायम पाठीशी उभी राहिले त्यामागचं कारण म्हणजे संतोष देशमुख तसं व्यक्तिमत्त्व होतं. आज जर ते तशी व्यक्ती नसते तर आज ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते. मात्र आज घडीला जे आपण बघतोय जे चार्जशीटमध्ये म्हटलं आहे की जो आडवा येईल त्याला उडवून टाका हे वक्तव्य अतिशय क्लेशदायक आणि चीड आणणारे आहे. असे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये त्यामुळे या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी ही अंजली दमानिया यांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=YUKP6WADL-M
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.