Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरात याच्या सीडीआरची मला कॉपी मिळाली आहे. मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. (Anjali Damania On Ashok Kharat CDR)

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला (Ashok Kharat) झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमींग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असं गंभीर आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. 1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानियांच्या हाती लागला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे कॉल्स झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहे.  मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा एक कॉल अशोक खरातला झाला, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. (Ashok Kharat Calls Record)

Comments are closed.