गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, रबीश
मुंबई : शहरातील (Mumbai) केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्याप्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिसांना काही प्रश्न केले आहेत. तसेच, आरोपी अनंत गर्जेच्या वकिलावरही त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली. आत्ताच्या घटकेला गौरीच्या आई-बाबांशी माझं बोलणं झालं, बाकीच्या दोन आरोपींना अद्याप अटक का झाली नाही? असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना अटक (Police) झाली पाहिजे, त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे. त्यांच्या बाजूने बोलणारा वकील वाटेल तो बोलतोय, हिच्या आई-वडिलांना 2021 च्या घटनेबद्दल माहिती होतं असं तो सांगतोय. मात्र, हे सर्व खोटं आहे, जर माहिती असतं तर त्यांनी कधीही लग्न करून दिलं नसतं. हे जे वकील बोलतायेत ते अब्सुलेटली रबिश आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी गौरीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं.
भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत अनंत बर्गेला अटकही केली आहे. मात्र, गौरीच्या हत्येच्या आरोपात ननंद आणि दीराला अटक करा अशी मागणी गौरी पालवेंच्या वडीलांनी केली आहे, त्यांनी त्याबाबत वरळी पोलिसांना पत्र देखील दिले आहे. पण, अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यावरुन, अंजली दमानिया यांनी पोलिसांना सवाल केले आहेत. त्या दोघांना अटक का होत नाही. सरकारी नोकर आहेत, म्हणून अटक केली जात नाही. पण, आताच्या घटकेला त्यांना बोलवून त्यांचं स्टेटमेंट घेणे गरजेचे आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं.
मुलीच्या पालकांना सीसीटीव्ही फुटेज मिळावे
जे काल तिच्या वडिलांनी म्हटलं ते खरं आहे. पोलीस दिरंगाई का करतात याचे उत्तर देणे गरजेचे आहे. बाकीच्या दोन आरोपींची चौकशी झाली पाहिजे, त्या नवीन टॉवर बिल्डिंगचे पूर्ण दिवसभराचे सीसीटीव्ही फुटेज त्यांना हवे आहेत. कोण आले कोण गेले हे त्यांना स्वतःला पाहायचं आहे. हाय प्रोफाईल केसेस असले की गडबड होण्याचे खूप काही चान्सेस असतात. त्यांनी पत्र देखील दिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांना सीसीटीव्ही मिळाले पाहिजे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करावा
पालघरच्या मोखाडा येथील प्रसुत महिलेला अर्धवट रस्त्यातच उतरवणाऱ्या रुग्णावाहिका चालकावरही दमानिया यांनी संताप व्यक्त केला. त्या माणसाला हृदय होतं की नाही मला कळत नाही. तो जर बाळासह महिलेला रस्त्यात सोडून ॲम्बुलन्स घेऊन जात असेल तर यापेक्षा शॉकिंग काहीच नाही. त्या माणसाला कळत नाही, सी सेक्शन झालं म्हणजे असं पोट कापलं जातं, एक एक टाके असतात, खूप दुखतात. नॉर्मल माणूस असं कृत्य करणार नाही, सर्वच आता राक्षसी होत चालले आहेत. तिथल्या मेडिकल ऑफिसरने याची दखल घेऊन तात्काळ त्या ॲम्बुलन्सवाल्यावर कारवाई केली पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
हेही वाचा
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आणखी वाचा
Comments are closed.