ठाणे कोर्टात हजर; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे

ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी आज त्यांना ठाणे (Thane) न्यायालयात हजर राहवे लागले. 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीयांना मारहाण केल्या प्रकरणात राज ठाकरे यांचा कोर्टाने जबाब नोंदवला. त्यावेळी, राज ठाकरेंना न्यायमूर्तींकडून काही प्रश्न विचारण्यात आले. न्यायमूर्ती (Court) अभिजीत कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना राज यांनी थोडक्यात उत्तरे दिली. तसेच, या गुन्ह्याशी माझा काहीही संबध नाही, मी त्यादिवशी नाशिकला होतो, मी इथे नव्हतो. तसेच, माझ्यावरील आरोप खोट आहेत, असे म्हणत राज यांनी न्यायमूर्तींना उत्तरे दिली.

ठाणे कोर्टात न्यायमूर्ती आणि राज ठाकरे यांच्या थोडक्यात संवाद झाला. त्यावेळी, न्यायमूर्तींनी राज ठाकरेंच्या नावापासून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एकूण 7 प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आली होती, त्यावर मनसेप्रमुखांनीही शांतपणे थोडक्या उत्तरे दिली.

राज ठाकरे आणि न्यायमूर्तींमधील संवाद, प्रश्नोत्तरे

न्यायमूर्ती अभिजीत व्हि कुलकर्णीं –  आरोपींना हजर करा

(( राज ठाकरे पुढे जावून न्यायमूर्तीं समोर उभे राहिले ))

न्यायमुर्ती अभिजीत कुलकर्णी- तुमचे नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे

राज ठाकरे – होय

न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी – रघुनाथ गंगाराम शेलार आणि इतर साक्षीदार यांनी दाखल केलेल्या गुन्ह्या नुसार 2008 मध्ये परीक्षार्थींना मारहाण करण्यात आली होती

राज ठाकरे – खोटे…

न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी – शेख रहीम यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आकाश काळे या अटक आरोपीची झडती घेतली असता त्याच्या खिशात मनसे या पक्षाचे सदस्य असल्याचे ओळखपत्र  मिळाले होते?

राज ठाकरे  – मी त्या वेळेस इथेच नव्हतो …

न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी – तुम्हाला सगळं विचारेन तेव्हा सांगा बोलायला संधी दिली जाईल

राज ठाकरे : हे सगळं खोटं आहे

न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी – अरुण जगताप तपास अधिकारी यांना तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाली

राज ठाकरे – खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता

न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी – अरुण जगताप तपास अधिकारी यांनी तुमच्या चिथावणी खोर भाषणांची सीडी मिळवण्यासाठी पत्र व्यवहार केला आणि ती सीडी मिळवली आणि त्यात तुमचे चिथावणीखोर भाषण आढळले

राज ठाकरे – मुळात मी तिथे नव्हतो मी तेव्हा नाशिकमध्ये होतो

न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी – तुमचा जबाब नोंदवण्यात आला आहे तुम्ही सही करुन जावू शकता

हेही वाचा

राज ठाकरे म्हणाले, गुन्ह्याशी माझा संबंध नाही; न्यायाधीशांनी जबाब वाचून दाखवला, ठाणे कोर्टात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.