अर्शिन कुलकर्णीने मुंबईच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं, तुफानी शतकी खेळी; पृथ्वी शॉनेही जुन्या संघ
मुंबई विरुद्ध महाराष्ट्र विजय हजारे ट्रॉफी 2026 : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पाचव्या फेरीत मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना सुरू आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अक्षरशः योग्य ठरवला.
पृथ्वी शॉ अन् अर्शिन कुलकर्णीने मुंबईच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं…
महाराष्ट्रच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni Century 114 runs) यांनी झंझावाती पद्धतीने केली. अर्शिन कुलकर्णीने मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांवर हल्लाबोल करत तुफानी शतकी खेळी साकारली. त्याने 114 चेंडूत 114 धावांची शानदार खेळी करताना 11 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि संयमी फलंदाजीमुळे महाराष्ट्राला भक्कम पाया मिळाला.
अर्शीन कुलकर्णी 105 चेंडूत 100 धावा (11×4, 2×6) महाराष्ट्र 218/1 #उद्ध्वस्त #विजय हजारे #एलिट स्कोअरकार्ड:https://t.co/eRw9i4JWLd
— BCCI डोमेस्टिक (@BCCIdomestic) ३ जानेवारी २०२६
दुसरीकडे, माजी मुंबईकर पृथ्वी शॉनेही जुन्या संघाविरुद्ध आपला इंगा दाखवला. 75 चेंडूत 71 धावा करताना त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. गेल्या वर्षी मुंबई सोडून महाराष्ट्रात दाखल झालेल्या शॉने या सामन्यात मुंबईविरुद्ध खेळताना कोणताही संकोच न ठेवता आक्रमक फलंदाजी केली.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने ठोकले अर्धशतक
सलामीवीर बाद झाल्यानंतर महाराष्ट्राच्या डावाची जबाबदारी कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) समर्थपणे सांभाळली. ऋतुराजनेही अर्धशतक ठोकत संघाची धावसंख्या वेगाने पुढे नेली. वृत्त लिहिले तेव्हा तो 50 चेंडूत 65 धावांवर नाबाद खेळत होता, तर महाराष्ट्राने 42 षटकांत 2 गडी गमावून 275 धावा केल्या होत्या.
पृथ्वी शॉने आपल्या जुन्या संघ मुंबईविरुद्ध महाराष्ट्रासाठी 71(75) धावांची खेळी केली 💥💥💥#पृथ्वीशॉ#मुंबई महाराष्ट्र वि #vht pic.twitter.com/XPA47Xubau
— BLA (@IntimateTechy) ३ जानेवारी २०२६
पंजाबचा दणदणीत विजय (Punjab won by 10 wkts vs Sikkim)
सिक्कीमविरुद्ध पंजाबने एकतर्फी सामना जिंकत 10 विकेट्सनी धूळ चारली. प्रथम गोलंदाजीत अर्शदीप सिंगने पंजा उघडत सिक्कीमचा संपूर्ण संघ अवघ्या 75 धावांत गुंडाळला. त्यानंतर किरकोळ लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने तुफानी फलंदाजीचा जलवा दाखवला. पंजाबने केवळ 6.2 षटकांतच 81 धावा करत सामना सहज जिंकला आणि तब्बल 262 चेंडू शिल्लक असतानाच विजय साजरा केला. प्रभसिमरन सिंगने 26 चेंडूत नाबाद 53 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली.
हे ही वाचा –
शाहरुख खानची जीभ छाटण्याच्या धमकीने खळबळ; BCCI ने काढला फतवा, मुस्तफिजुर रहमानवर केली मोठी कारवाई
आणखी वाचा
Comments are closed.