आगामी निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसींची MIM नव्या भिडूच्या शोधात, राज्यात ”या’ पक्षासोबत बोलणी
छत्रपती संभाजिनगर: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) नुकताच मुंबईत संपन्न झाला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यांच्या एकत्र येण्याने मराठीजन सुखवाला असून ही एक नव्या राजकीय प्रवासाची नांदी असल्याचे ही बोललं जात आहे. ऐकुणात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन बंधू एकत्र आल्याने नक्कीच नवं वळण लागणार.
दरम्यान, असे असताना गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यात एमआयएम पक्ष निष्प्रभ ठरला असताना आणि दुसरीकडे वंचितशी बिघडल्यानंतर एमआयएम (MIM) एका नव्या मित्रपक्षाच्या शोधात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एमआयएम नवा भिडू शोधत असल्याची माहिती पुढे आली आहे.
एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक
दरम्यान, भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या पक्षाची युती करण्याची तयारी एमआयएमने दर्शवल्याची माहितीही आता समोर आली आहे. आजाद समाज पक्ष महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास आणि एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यामध्ये बैठक पार पाडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घरी ही पहिली बैठक झाली. स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणूकात आंबेडकरी विचारांची आणि मुस्लिम मतांची बांधणी करण्याचा प्रयत्न या निमित्याने राज्यात केलं जात असल्याचे ही पुढे आले आहे. दरम्यान, बैठकीचे एक्सकलुसिव्ह फुटेज एबीपी माझाच्या हाती लागेल आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकी काय राजकीय सूत जुळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच?
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणेनागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबईवसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. मात्र प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये राबवली जाते. या प्रक्रियेसाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.