महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्समधून हादरवणारी माहित
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) भोंदूगिरी करण्यासोबतच काळा पैसा पांढरा करण्यासाठी हवाला रॅकेटही चालवत असल्याचा संशय आहे. कारण, अशोक खरातच हवाला रॅकेट दुबईपर्यंत पोहोचलं होतं, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अशोक खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याचं हे रॅकेट चालवत होता. या अवैध धंद्यासाठी खरातने दिवसाला 25 हजार रुपये भाडं असलेली पंचतारांकित रुम वर्षभरासाठी बुक केली होती. तिथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत होतो. एसआयटीने केलेल्या तपासात त्याच्या दोन मोबाईलमधून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार सुरु होते. एका बिल्डरचा तब्बल 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नाशिक-पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. अशोक खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याचा संशय आहे. मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशीर्वादाच्या’ नावाखाली हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण सुरु होती. जमीन व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर झाल्याचा तपास पथकाला संशय आहे. महाराष्ट्र कर्नाटक मध्ये देवदर्शनाच्या नावाखाली बनावट खाते उघडल्याचा खरतवर तक्रारदाराचा आरोप आहे. पॅन-आधार वापरून सहकारी पतसंस्थांमध्ये खाते उघडल्याची माहितीही समोर आली आहे.
Ashok Kharatwar Ankhi Ek Gunha Dakhal- (अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज)
अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाआहे. अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. 2021 साली समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत उघडली 100 खाती उघडून या खात्यातून आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधीक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलीसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आला आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली. अनेकांना जाळ्यात फसवून भोंदू खरातने अमाप माया जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. याचवरुन भोंदू खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.. अशोक खरात प्रकरणाचा आता ईडी तपास करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदिले आहे. (अशोक खरात प्रकरण नाशिक)
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा ‘हवाला रॅकेट’- (Ashok Kharat Case)
अशोक खरात याने केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर ‘हवाला’ रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे 25 हजार रुपये इतके होते. वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.