पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? न्यायाधीशांचा अशोक खरातला सवाल, भोंदूबाबाने एकाच शब्दात
अशोक खरात कोर्टात सुनावणी नाशिकचा बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर (Court) हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने खरातला पोलिसांच्या वागणुकीबद्दल विचारणा केली असता, त्याने अवघ्या एकाच शब्दात उत्तर दिले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती. त्यामुळे एसआयटीने (SIT) त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले.
Ashok Kharat Court Hearing: न्यायाधीशांचा थेट सवाल आणि खरातचे उत्तर
सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्वप्रथम आरोपीचे नाव विचारून त्याची ओळख पटवून घेतली. त्यानंतर न्यायाधीशांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. पोलीस कोठडीत असताना पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? असे न्यायाधीशांनी खरातला म्हटले. यावर नेहमी ‘दैवी शक्ती’ आणि ‘तंत्र-मंत्राच्या’ बाता मारणाऱ्या अशोक खरातने एकाच शब्दात उत्तर दिले. “नाही,” असे म्हणत खरातने पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.
अशोक खरात कोर्टात सुनावणी : अता चौथ्या गुन्ह्यात वर्ग कर्नार
तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, एसआयटीने खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग (Transfer Custody) करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील तपासाचा हक्क अबाधित राखून चौथ्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी खरातचा ताबा मिळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी अर्जात म्हटले आहे. यानंतर आरोपी तुरंगात जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचा ताबा घेण्याचा सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. तर अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करत ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून 60 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये 5, पुण्यात 3 आणि शिर्डीत 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. समता पतसंस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, खरातच्या मालमत्ता आणि निधीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे. तर नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थानी आयकर विभागाकडूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आणखी वाचा
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, ‘देवाला माहिती…’
आणखी वाचा
Comments are closed.