अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या
अशोक खरात: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे महाराष्ट्रातील राजकारण्यांशी किती घनिष्ट संबंध होते, याचा पुरावा समोर आला आहे. अशोक खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात (Truptbala Kharat) हिच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो समोर आला आहे. या लग्नपत्रिकेवर अनेक राजकारण्यांची नावे असल्याची माहिती समोर आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी), भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून नमूद करण्यात आली होती. अशोक खरात याच्या मुलीच्या नाशिकमधील लग्नालाही महाराष्ट्रातील अनेक राजकारणी हजर होते. यावरुन अशोक खरात (Ashok Kharat) याचे राजकारण्यांशी किती घट्ट नाते होते, हे समोर आले आहे. (Nashik Crime news)
सध्या एसआयटीकडून अशोक खरात याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे महाराष्ट्रातील 40 ते 45 राजकीय नेत्यांशी संबंध होते. हे राजकीय नेते नियमितपणे अशोक खरात याच्या संपर्कात असायचे. या राजकीय नेत्यांचे अशोक खरात याच्याशिवाय पानही हलायचे नाही. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला आणि वेळेला भरायचा याचा मुहूर्तही अशोक खरात या राजकीय नेत्यांना काढून द्यायचा. खरात याच्या सांगण्यापूर्वी हे राजकीय नेते कोणताही राजकीय निर्णय घ्यायचे नाहीत. अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये या राजकारण्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती. एसआयटीला दोन दिवसांपूर्वीच मिळाला फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यामधून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.