‘ज्योतिषा’चा मुखवटा टराटरा फाटला, कॅप्टन अशोक खरातला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; अनेक आक्षेपार्
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवार (दि. २३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर येत असून, त्यातील मजकुराची सखोल चौकशी सुरू आहे.
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: धार्मिक विश्वासणारे ना-नफा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 35 वर्षीय विवाहित पीडित महिला कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज येथे अशोक खरातला भेटली होती. खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला वारंवार कार्यालयात बोलावून तिच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला. आरोपांनुसार, त्याने पीडितेला गुंगीकारक पदार्थ दिले, तिला संमोहित केले आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तसेच पतीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हा अत्याचार सुरू असल्याचा आरोप आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: तक्रारीनंतर गुन्हा उघड
तीन वर्षे सहन केल्यानंतर अखेर पीडित महिलेने धाडस करत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि अखेर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या 58 व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून, तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
Who is Ashok Kharat: कोण आहे कॅप्टन अशोक खरात?
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये मिरगाव येथील मंदिराला भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला होता. त्यानंतर अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते. मात्र, आता त्याच्यावर झालेले गंभीर आरोप आणि उघडकीस आलेले कृत्य यामुळे त्याची प्रतिमा पूर्णपणे धुळीस मिळाली असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.
Sushma Andhare: सुषमा अंधारेंचे द्विट
कॅप्टन खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रावहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रावहिनीच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का? की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे….?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.