70 कोटींना लुबाडले! भोंदू अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लैंगिक अत्याचाराबरोबरच व्यावसायिकाकडून 70 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तसेच बेनामी बँक खात्यांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबा अशोक खरातला विशेष न्यायालयात आज हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली.

भोंदू बाबा अशोक खरातने अहिल्यानगरमधील समता नागरी सहकारी पतसंस्थेत एकाच दिवसात तब्बल 60 बेनामी बँक खाती उघडली. यासाठी त्याने त्याच्या भक्तांच्या आधारकार्डचा आणि कागदपत्रांचा त्यांच्या नकळत गैरवापर केला. खंडणी आणि फसवणुकीच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून खरातने स्वतःच्या आणि पुटुंबीयांच्या नावावर जंगम आणि स्थावर मालमत्ता गोळा केली असून याप्रकरणी ईडीने खरातविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक तुरुंगात असलेल्या खरातला अटक करण्यासाठी विशेष न्यायालयाने मंगळवारी ईडीला परवानगी दिली. आज सत्र न्यायालयात खरातला हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी 10 दिवसांची कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीशांनी याची दखल घेत 26 मेपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली.

Comments are closed.