वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जण

वांद्रे रेल्वे स्थानक जमीनदोस्त : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीबनगर भागात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला काल हिंसक वळण लागले. अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे आणि पालिकेकडून सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. याप्रकरणी कडक पावले उचलत निर्मलनगर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 15 जणांना अटक केली आहे. या हिंसक घटनेत 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bandra Railway Station Demolition: इमारतींवरून दगडफेक; व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या अनधिकृत झोपड्या हटवण्याचे काम शेकडो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सुरू आहे. काल कारवाईच्या दुसऱ्या दिवशी, परिसरातील इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही अचानक पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. पोलिसांनी सुरुवातीला जमावाला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र समोरून होणारा दगडांचा वर्षाव थांबला नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Bandra Railway Station Demolition: पोलिसांनी घरात घुसून दंगलखोरांना घेतले ताब्यात

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत लाठीचार्ज केला. ज्या इमारतींमधून आणि ठिकाणांवरून दगडफेक केली जात होती, तिथे पोलीस जवान घुसले आणि त्यांनी समाजकंटकांना जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 15 प्रमुख आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी काल बांद्रा पूर्व येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये एकूण 10 आरोपींची नावे नमूद केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 61(2), 109, 121(1), 121(2), 132, 189(2), 189(3), 191(2), 191(3), 190 तसेच रेल्वे पोलीस कायदा कलम 146 आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दगडफेकी प्रकरणी 100 ते 150 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bandra Railway Station Demolition: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, आज या कारवाईचा तिसरा दिवस असून अद्याप 40 टक्के अनधिकृत इमारती पाडण्याचे काम शिल्लक आहे. परिसरात सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही अतिक्रमणविरोधी मोहीम पुढील दोन दिवस अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Bandra Railway Station Demolition: वांद्रे अतिक्रमण प्रकरण नेमकं काय?

1. मुंबईतील वांद्रे स्टेशन परिसरात, पश्चिम रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण करण्यात आलं आहे.

2. रेल्वे स्टेशनला घासूनच या अनधिकृत झोपडपट्ट्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची समस्याही निर्माण झाली होती.

3. या ठिकाण 500 हून अधिक झोपडपट्ट्या असून तब्बल 5 हजार स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण आहे.

4. या ठिकाणी असलेल्या कचऱ्यामुळे अनेकदा आगीच्याही घटना घडल्या आहेत.

5. 27 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्यांदा या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश काढण्यात आले.

6. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे नऊ वर्षे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

7. अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास मंजुरी देण्यात आली.

8. मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू झाली.

9. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या कारवाईवेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही कारवाई आणखी तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता आहे.

10. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी मार्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Bandra Railway Station Demolition: वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलीस परिसरात घुसताचं काय घडलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.