अशोक खरातचा लुटीचा ‘रिंग’ मास्टर प्लॅन उघड, पाच हजारांची अंगठी लाखांना विकली; SIT कडून ‘त्या’ ऑ
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती आता मोठे पुरावे लागले आहेत. खरातच्या सातव्या गुन्ह्याचा तपास करत असताना ‘एसआयटी’ने त्याच्या ‘ओकस’ कार्यालयाची झडती घेतली. यावेळी भाविकांची आर्थिक लूट करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक कोरा धनादेश जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे खरातचे काळे कारनामे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Ashok Kharat Nashik Crime News: 5 हजारांची अंगठी लाखांना विकायचा!
एसआयटीच्या तपास पथकाला खरातच्या कार्यालयात स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठी बनवण्याची एकूण 35 गोलाकार मापे सापडली आहेत. तपासात असे समोर आले आहे की, भोंदू खरात आपल्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या आणि पीडित महिलांच्या बोटांचे माप घेऊन त्यांना विशिष्ट ‘अंगठी’ घालण्याचा सल्ला द्यायचा. बाजारात साधारण 5 हजार रुपयांना मिळणारी अंगठी तो भाविकांना चक्क लाखो रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: धनादेश आणि आर्थिक लुटीचे पुरावे
तपास पथकाने कार्यालयातून एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश (Cheque) देखील जप्त केला आहे. पूजेच्या विधीसाठी आणि समस्या निवारणासाठी खरात हा भक्तांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेतच, मात्र आता या पुराव्यांमुळे त्याने भक्तांची आर्थिक लूट कशा प्रकारे केली, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
Ashok Kharat Nashik Crime News: नवाखळीमध्ये पूजाविधीचा पिळवणूक
धार्मिक विधी आणि दैवी शक्तीचा धाक दाखवून अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत होता. पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो या अंगठ्यांचा आणि पूजेचा वापर करत असे. एसआयटीने जप्त केलेले हे पुरावे न्यायालयात खरात विरोधात भक्कम आधार ठरणार आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कडक पावले उचलली असून, आणखी कुणाची लूट झाली असल्यास त्यांनी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.